kalyan News : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, वर्षभरात 18,800 नागरिकांचा घेतला कुत्र्याने चावा
Kalyan News : गेल्या 12 वर्षांपासून कल्याण महापालिका क्षेत्रात पशू गणना झाली नसल्याचं समोर आलं आहे. पण या काळात कुत्र्यांच्या लशीकरणावर मात्र लाखोंचा खर्च झाल्याची आकेडेवारी सांगतेय.
ठाणे : कुत्र्याच्या हल्ल्यात कल्याणमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याण गोल्डन पार्क परिसरातील तानाजी नगर येथे ही घटना घडली असून त्यामध्ये शुभम चौधरी या 27 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शहरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंबरनाथमध्ये दोन वेगवेगळ्या घटनेत लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केला होता. तर कल्याण टिटवळ्यातील एका महिलेवर चार ते पाच कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली होती. या घटना ताज्या असतानाच कल्याणच्या गोल्डन पार्क तानाजी नगर मधील एका तरुणाला कुत्र्याने चावा घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
दोन महिन्यापूर्वी गोल्डन पार्क परिसरात भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला होता त्यात हा तरुण जखमी झाला होता. वेळेवर उपचार घेतले नसल्याने त्याला कस्तुरबा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. या उपचारदरम्यान तरुणाचा गुरुवारी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भटक्या कुत्र्यांचा पालिकेने बंदोबस्त करावा, माझा एकुलता एक मुलगा कुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू पावला याला जबाबदार कोण असा सवाल मयत शुभमच्या वडिलांनी उपस्थित केला आहे.
कुत्र्याच्या हल्ल्यात तरुण मयत झाल्याची माहिती केडीएमसी प्रशासनाला नाही. या प्रकरणाची माहिती घेऊन चौकशी करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील श्वानाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून गेल्या 12 वर्षांत पशूगणना झाली नसल्याने श्वानांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. 2024 या वर्षात मनपा हद्दीत 18,800 नागरिकांचा श्वानांनी चावा घेतला आहे. श्वानाच्या निर्बिजीकरण आणि लशीकरणावर पालिकेचा लाखो रुपयांचा खर्च होत असताना या घटना घडत आहेत.
Dog sterilization and vaccination
Jan 24 to Nov 24 = 12406
Jan 23 to Dec 23 = 14515
Dog Bite cases and vaccination in kdmc
Jan 24 to oct 24 = 18000
Jan 23 to Dec 23 = 18939
ही बातमी वाचा: