Vidhansabha Election Special Report : दिवाळीनंतर निवडणूक; महायुतीला काय फायदा ?
Vidhansabha Election Special Report : दिवाळीनंतर निवडणूक; महायुतीला काय फायदा ? विधानसभेची निवडणूक कधी होणार? याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता आहे... आता याबाबत विश्वसनीय सूत्रांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिलीय... त्यानुसार विधानसभेच्या निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यताय... मात्र दिवाळीनंतर निवडणपका झाल्यास नेमका कुणाला फटका आणि कुणाला फायदा होईल... याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट पाहूया... विधानसभा निवडणूक ही ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असे अंदाज बांदले जात असतानाच आता ही निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच दिवाळीनंतरच होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय.विधानसभा निवडुकीची आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागू होण्याची शक्यता आचारसंहिता लागू झाल्यानंतर ४५ दिवसांनी नवीन विधानसभा अस्तित्वात येणे अपेक्षित येत्या २६ नोव्हेंबरपूर्वी ४५ दिवस म्हणजे १२ ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाली तरी विहित कालमर्यादेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान होऊ शकतं. १४ किंवा १५ नोव्हेंबरला निकाल जाहीर होण्याची शक्यता आमदारांच्या शपथविधीसाठी विधानसभेच्या अधिवेशनकरता १२ दिवस हाती असतील त्यामुळे २६ नोव्हेंबरच्या आधी नवीन विधानसभा अस्तित्वात येऊ शकेल लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्टला जमा होणार निवडणूक दिवाळीनंतर झाल्यास सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्येही पैसे महिलांच्या खात्यात जमा होतील याचा प्रभाव महिला मतदारांवर होईल. त्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो दिवाळीनंतर निवडणूक झाल्यास प्रभावी निर्णय, महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचं भूमिपूजन करून प्रतिमा सुधारण्यास महायुतीला आणखी दोन महिने मिळतील शिधावाटप करत सर्वसामान्यांची दिवाळी सरकारला गोड करता येईल, ज्याचा फायदा महायुतीला होईल कोस्टल रोड, समृध्दी महामार्गाचा दुसरा टप्पा याचा अधिकाधिक प्रचार सरकारला करता येईल जागा वाटपासाठी पुुरेसा वेळ घेता येईल आणि महायुतीला योग्य नियोजन करता येईल