(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOP 80 News | सकाळी आठच्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट | 29 जुलै 2024 | ABP Majha
राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता, गुरुवारपर्यंत राज्यात कुठेही रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी नसून, काही ठिकाणी तुरळक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज.
भंडारा शहरात ७७ मिलिमीटर पावसाची नोंद, अनेक घरात शिरलं पावसाची पाणी, आठवडाभरात पुन्हा एकदा पूरपरिस्थिती.
भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, तीस पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटला, रस्त्यावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीसाठी मार्ग बंद.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरुन मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग वाढवला, १८ हजार ९८१ क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, पानशेत आणि वरसगाव धरणही भरायला सुरुवात.
मुसळधार पावसामुळे नागपूरच्या तोतलाडोह प्रकल्पाचे 14 दरवाजे उघडले, तर निम्न वेणा धरणाचे 21 दरवाजे आणि नांद धरणाचे 7 दरवाचे उघडले असून धरणातून 1 हजार 867 क्युसेकने पाण्याचा विसर्ग.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील मकरधोकडा तलाव ओव्हरफलो, पर्यटकांची गर्दी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त.
मुसळधार पावसामुळे भंडाऱ्याच्या साकोली - तुमसर मार्गावरील मक्कीटोला येथील पूल वाहून गेला, त्यामुळे बस सेवा बंद राहणार असल्यानं विद्यार्थी आणि नागरिकांना करावी लागणार पायपीट.
कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात दमदार पाऊस, ताम्रपर्णी आणि घटप्रभा नदीचे पाणी पात्राबाहेर, भाजप नेते शिवाजीराव पाटलांकडून पूरस्थितीची पाहणी.