एक्स्प्लोर

Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला

Madha Vidhan Sabha Election : माढा विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून इच्छुकांच्या संख्येत वाढ असून आता विठ्ठल सहकारी कारखान्याचे अभिजीत पाटलांनीही मुलाखत दिली आहे. 

सोलापूर: माढा मतदारसंघात इच्छुक असलेले अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मुलाखतीसाठी पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.अभिजीत पाटील हे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असून लोकसभा प्रचारादरम्यान त्यांच्या कारखान्यावर जप्ती आली होती. त्यांनी शेवटच्या दोन दिवसात शरद पवार गट सोडून भाजपचा प्रचार केला होता. यानंतर त्यांच्या कारखान्यावरची जप्ती लगेच मागे घेण्यात आली होती. तसेच कर्जात अडकलेल्या कारखान्याला मोठं आर्थिक पॅकेजही देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं. 
 
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय अशी अभिजीत पाटील यांची ओळख आहे. आता त्यांनी माढा विधानसभेसाठी शरद पवार गटाकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे. त्यामुळे अभिजित पाटील यांनी फडणवीसांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला की काय अशी चर्चा सध्या सुरु आहे.

माढ्यात अनेकजण इच्छुक

पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विविध मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. माढा विधानसभेसाठी संजय कोकाटे, शिवाजी कांबळे, संजय पाटील घाटणेकर, बाळासाहेब पाटील, नितीन कापसे अशा जवळपास दहा जणांनी मुलाखती दिल्या आहेत. यात आमदार बबन शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी देखील मुलाखत दिल्याची माहिती आहे. 

ज्यांची नावं चर्चेत, तेच उपस्थित नाहीत

अभिजीत पाटील यांनी याआधी अपक्ष निवडणूक लढविण्याचे घोषित केल्यानंतर पुन्हा शरद पवार गटाकडे उमेदवारीसाठी मुलाखत दिल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे. माढा मतदारसंघातून शरद पवार हे आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे यांना उमेदवारी देणार अशी शक्यता असताना रणजीत शिंदे मात्र या मुलाखतीसाठी पोचलेले नव्हते. तसेच मोहिते पाटील गटाकडून शिवतेजसिंह मोहिते पाटील हे निवडणूक लढविण्यास इच्छुक असताना तेही मुलाखतीसाठी तिथे हजर नसल्याचे समजते. 

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Maharashtra Live blog updates: तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीत चुकून पडलेले दागिने परत न करण्यावर संस्थान ठाम
Maharashtra Live blog updates: तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीत चुकून पडलेले दागिने परत न करण्यावर संस्थान ठाम
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Mumbai Mayor Election 2026: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय अन्...
मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय अन्...

व्हिडीओ

Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण
Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...
The court grants relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Maharashtra Live blog updates: तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीत चुकून पडलेले दागिने परत न करण्यावर संस्थान ठाम
Maharashtra Live blog updates: तुळजाभवानी मंदिराच्या दानपेटीत चुकून पडलेले दागिने परत न करण्यावर संस्थान ठाम
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Mumbai Mayor Election 2026: मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय अन्...
मुंबई महापौरपदाच्या निवडणुकीबाबत महत्त्वाची अपडेट, रात्रीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय अन्...
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
Embed widget