एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा

बोरिवली पश्चिमेत रायगड प्रतिष्ठान आयोजित रंग रास या गरबा कार्यक्रमाचे 600 बनावट सीझन पास बनविणाऱ्या 6 जणांच्या टोळीला बोरिवली पोलिसांनी ताब्यात घेतलं

मुंबई : देशभरात नवरात्री (Navratri) उत्सवाची धूम पाहायला मिळत असून सर्वत्र देवाची जागर सुरू आहे. मुंबई (Mumbai), पुण्यासह महानगरांमध्ये विविध मंडळे व क्लबच्या माध्यमातून गरबा आणि दांडिया खेळांचे आयोजन करण्यात येत आहे. या खेळांच्या महोत्सवात कुणी बाहेरच्यांनी किंवा अज्ञातांनी सहभागी होऊ नये म्हणून शक्य ती खबरदारी घेतली जाते. त्यासाठी, तिकीट किंवा पासेस देऊनच एंट्री दिली जाते. मात्र, मुंबईतील काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या गरबा उत्सावात स्कॅम करुन पैसे कमावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी, बनावट पासेस तयार करुन विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईच्या बोरिवली पश्चिमेत गरबाचा बनावट पास बनवणारा सहा जणांच्या टोळीला बोरिवली पोलिसांनी (Police) अटक केली आहे. अटक करण्यात आलेले सर्वजण कॉलेजचे विद्यार्थी असून त्यांनी लाखो रुपये कमावण्याची योजना या माध्यमातून तयारी केली होती. मात्र, त्यांचा भांडोफोड झाला.  

बोरिवली पश्चिमेत रायगड प्रतिष्ठान आयोजित रंग रास या गरबा कार्यक्रमाचे 600 बनावट सीझन पास बनविणाऱ्या 6 जणांच्या टोळीला बोरिवली पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून अधिक तपास करण्यात येत आहे. अटक आरोपीचे नाव मनोज वेशी चावडा (वय 19 वर्ष),अंश हितेश नागर,(वय 20 वर्ष), भव्य जितेंद्र मकवाना (वय 19 वर्ष), राज शैलेश मकवाना,(वय 19 वर्षे), यश राजू मेहता,(वय 19 वर्षे) आणि केयूर जगदीश नाई,(वय 20 वर्ष) आहे. अटक करण्यात आलेले हे सर्व आरोपी 18 ते 20 वर्षाच्या वयोगटातील असून हे सर्व कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी आहेत.

या सर्व आरोपींने नवरात्रीच्या काळात कमी दिवसात जास्त पैसे कमावण्याचे हेतूने 600 गरबाचे बनावट पास बनवले, ज्याचा बाजारभाव 6 लाख रुपये एवढा आहे. बोगस गरबाचे पास बनवणारा या मुलांच्या टोळीचे सर्व साहित्य बोरिवली पोलिसांनी जप्त केली आहे. सोमवारी संध्याकाळी बोरिवली पश्चिमेत रंग रास गरबा खेळण्यासाठी दोन मुलं बनावट गरबा पास घेऊन गेले होते. सिक्युरिटी चेकिंग दरम्यान या पासवरचा बारकोड स्कॅन नं झाल्यामुळे सिक्युरिटीने या दोन्ही मुलांना पकडले. त्यानंतर सिक्युरिटीने दोन्ही मुलांना बोरिवली पोलिसांच्या स्वाधीन केले. बोरिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करुन बोगस गरबाचे पास बनवणाऱ्या 6 जणांची टोळक्याला अटक केली. दरम्यान, अटक आरोपीने आणखी किती गरबाचे बोगस पास बनवले आहेत, किती लोकांना ते पास विकले आहेत, आणि यामध्ये आणखी काही सदस्य आहेत का? याच्या शोध बोरिवली पोलिसांकडून घेतला जात आहे. 

हेही वाचा

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सHaryana Assembly Election Result 2024 : हरियाणा सेट, महाराष्टात इफेक्ट होणार? Special ReportAjit Pawar Baramati Vidhan Sabha : घोषणेनंतरही दादांना गराडा, स्क्रिप्टेड राडा? Special ReportPM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Embed widget