Top 50 News : बातम्यांचं अर्धशतक : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 03 Dec 2024 : 2 Pm
Top 50 News : बातम्यांचं अर्धशतक : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 03 Dec 2024 : 2 Pm
कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष, राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ.
नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी ७ ते ९ डिसेंबरदरम्यान विशेष अधिवेशन, तर ९ तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड, फडणवीसांची माहिती.
शिवसेनेच्या मंत्रिमंडळात यंदा मोठे बदल होण्याची शक्यता, दोन्ही निवडणुकीत केलेलं काम, पक्ष संघटनेच्या वाढीसाठी दिलेलं योगदान आणि प्रचारात किती साथ दिली त्यावरुन मंत्रिपद दिलं जाईल अशी माहिती.
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत उद्या महायुतीच्या नेत्यांची बैठक, तर आज राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली, बैठकीत ७ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपदाचे चेहरे निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती.
नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, सर्व मंत्र्यांच्या कामाचं मुल्यांकन करुन निर्णय घेतला जाईल, तिन्ही पक्षांना मंत्रिपदं द्यायची असल्यानं काही प्रमाणात मागे पुढे होईल, देवेंद्र फडणवीसांची माहिती.
११ किंवा १२ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, त्याबाबत लवकरच घोषणा केली जाईल, शिंदेंच्या शिवसनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांची माहिती.
कुणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील, शिंदे आम्हाला अपेक्षित मंत्रिपद देतील, लवकरच निर्णय होईल, उदय सामंत यांची माहिती.
भाजप 18 ते 20 मंत्रिपदं आपल्याकडे ठेवण्याची शक्यता. शिवसेनेला 12 ते 13, तर अजित पवारांना 8 ते 10 मंत्रिपदं मिळणार असल्याची सूत्रांची माहिती.