Kalyan Crime : कल्याण अत्याचार व हत्या प्रकरणात सरकारकडून नियुक्ती होताच उज्वल निकम म्हणाले, ताबडतोब शिक्षा होणं...
कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार व हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नियुक्ती केली आहे.
जळगाव: कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणातील नियुक्तीबाबत मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे आपल्याला कळवल्याचे उज्वल निकम यांनी स्पष्ट केले आहे. कल्याण पोलिसांनी याबाबत आरोप पत्र दाखल केल्यानंतरच न्यायालयीन कामकाजाला सुरुवात होणार असल्याची माहिती उज्वल निकम यांनी दिली.
समाजात अशा ज्या घटना घडतात त्याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचं उज्वल निकम यांनी स्पष्ट केलं. अशा गुन्ह्यात ताबडतोब शिक्षा होणं आणि लवकरात लवकर कामकाज पार पाडणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवायचे आहे, असंही ते म्हणाले. कल्याणच्या गुन्ह्यातही पोलिसांचा तपास झाल्यानंतर लवकरच खटला सुरू होणार असल्याचं निकम यांनी स्पष्ट केलं.
ज्या रिक्षातून मृतदेह नेला ती रिक्षा जप्त
कल्याण पूर्वेत एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करत हत्या केल्याची धक्कादायक घडली होती. या घटनेत नराधम विशाल गवळी आणि त्याची पत्नी यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एका रिक्षाचा वापर केला होता. ज्या रिक्षातून मृतदेह नराधम घेऊन गेला होता ती रिक्षा पोलिसांनी जप्त केली आहे. नराधम विशाल गवळी स्वतः रिक्षा चालवत होता तर त्याची पत्नी साक्षी मृतदेह घेऊन रिक्षाच्या मागील सीटवर बसली होती. जवळपास 13 किलोमीटर अंतरावर मृतदेह घेऊन जात बापगाव मधील कब्रस्तान जवळ मृतदेह फेकून या दोघांनी पळ काढला होता. त्यांनतर आधारवाडी परिसरात असलेल्या बार मध्ये दारू विकत घेऊन तो पसार झाला. विशाल गवळीला शेगावमधून अटक करण्यात आली होती.
भिवंडी कल्याण सीमेवरील गांधारी पुला नजीकच्या बापगाव या गावातील कब्रस्ताना परिसरातील निर्जन स्थळी एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली होती.या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी विशाल गवळी आणि त्याच्या बायकोला अटक केली होती.
कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातला आरोपी विशाल गवळी हा मानसिक दृष्ट्या फिट असून त्याला सायकीएट्रिक ट्रीटमेंटची गरज नाही, असा रिपोर्ट उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला आहे. 27 डिसेंबरला झालेल्या त्याच्या वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी हा गोपनीय रिपोर्ट सादर केला आहे.
इतर बातम्या: