एक्स्प्लोर

वाल्मिक कराड CID पोलिसांना शरण येणार; राजकीय, सामाजिक दवाब वाढल्याने तपासाला वेग

बीड जिल्ह्यात 28 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी सर्वच नेत्यांनी केली.

बीड : जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणात फरार आरोपींना अटक व्हावी, यासाठी जनतेतून पोलिसांवर दबाव आहे. त्यातच, विरोधकांनीही हा मुद्दा चांगलाच लावून धरला असून काँग्रेस, शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते मंत्री धनजंय मुंडेंच्या राजीनाम्याची आणि वाल्मिक कराडला अटक करण्याची मागणी करत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील ह्या प्रकरणात देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा म्हणून बीडमध्ये तळ ठोकला आहे. पोलिसांना तपासात मदत करताना सत्ताधाऱ्यांवर बीडच्या मंत्रीमहोदयांवर त्यांच्याकडून जोरदार टीका केली जात आहे. तसेच, वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) अटकेची मागणीही त्यांच्याकडून केली जात आहे. मात्र, पोलिसांकडून अद्यापही हत्याप्रकरणातील 3 आरोपी व खंडणीप्रकरणातील वाल्मिक कराडचा शोध घेतला जात आहे. आता, वाल्मिक कराड बीड (Beed) पोलिसांना शरण येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.  

बीड जिल्ह्यात 28 डिसेंबर रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढून संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी सर्वच नेत्यांनी केली. त्यासह, वाल्मिक कराडच या घटनेतील मुख्य सुत्रधार असून त्यालाही अटक करण्याची मागणी आमदार, खासदार व स्थानिक नेत्यांनी केली. तसेच, मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद दिल्यास मी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारेन, अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्‍यांना इशारा दिलाय. तर, धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडला पाठीशी घातलं जात असल्याचंही नेत्यांनी म्हटलं होतं. अखेर, सीआयडीच्या तपासाचा वेग, पोलिस यंत्रणा व सरकावर वाढत असलेला राजकीय, सामाजिक दबाव लक्षात घेत आता वाल्मिक कराड शरण येत असल्याची माहिती आहे. 

कोणत्या गुन्ह्यात होणार अटक

वाल्मिक कराड पोलिसांना शरण येण्याची शक्यता वर्तवतण्यात येत असूनउद्या किंवा परवा शरण येण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, आता वाल्मिक कराडला कोणत्या गुन्ह्यात पोलिसांकडून अटक केली जाते हे पाहावे लागेल. कारण, खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड आरोपी असून अद्याप खूनप्रकरणात त्यास आरोपी करण्यात आले नाही. त्यामुळे, आमदार जितेंद्र आव्हाड व अंजली दमानियांकडून खूनप्रकरणातही वाल्मिक कराडला गुन्हा दाखल करुन अटकेची मागणी केली आहे. पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असून उर्वरीत तीन फरार आरोपींना देखील अटक कधी होणार, हाही प्रश्न अनुत्तरीत आहे.

हेही वाचा

पवित्र प्राजक्ताची पवित्र फुले म्हणत पंकजा मुंडेंची अभिनेत्रीसाठी साहित्यिक भाषेत पोस्ट; सुरेश धसांना टोला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सेबीनं 15000 वेबसाइटस अन् सोशल मीडिया स्टार्सवर बंदी घालत दिला दणका, शेअर मार्केट गुतवणुकीबाबत चुकीचा सल्ला देणं भोवलं
शेअर मार्केट गुंतवणूक सल्ला देणाऱ्या वेबसाइट अन् सोशल मीडिया स्टार्सवर सेबीची बंदी, नेमकं काय घडलं?
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
Kalyan Crime : कल्याण अत्याचार व हत्या प्रकरणात सरकारकडून नियुक्ती होताच उज्वल निकम म्हणाले, ताबडतोब शिक्षा होणं...
कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणात उज्वल निकम बाजू मांडणार, मुख्यमंत्र्यांकडून नियुक्तीचा फोन
Shani Dev : पुढचे 89 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
पुढचे 89 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 29 December 2024Sushma Andhare On Medha Kulkarni : 'मेधाताई बालिशपणा थांबवा जरा!'सुषमा अंधारे संतापल्या...Vijay Wadettiwar PC : 'Dhananjay Munde दहा बायका करा पण कुणाचा खून करु नका!'Boisar Tarapur MIDC Fire : आगीचे लांबच लांब लोळ, धुराचे लोट; कारखान्याच्या आगीची Drone दृश्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेबीनं 15000 वेबसाइटस अन् सोशल मीडिया स्टार्सवर बंदी घालत दिला दणका, शेअर मार्केट गुतवणुकीबाबत चुकीचा सल्ला देणं भोवलं
शेअर मार्केट गुंतवणूक सल्ला देणाऱ्या वेबसाइट अन् सोशल मीडिया स्टार्सवर सेबीची बंदी, नेमकं काय घडलं?
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
5 लाखात बांगलादेशी नागरिकास बनवायचा भारतीय, बनावट पासपोर्टद्वारे पाठवायचा परदेशात; कसं फुटलं बिंग?
Kalyan Crime : कल्याण अत्याचार व हत्या प्रकरणात सरकारकडून नियुक्ती होताच उज्वल निकम म्हणाले, ताबडतोब शिक्षा होणं...
कल्याणच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार व हत्या प्रकरणात उज्वल निकम बाजू मांडणार, मुख्यमंत्र्यांकडून नियुक्तीचा फोन
Shani Dev : पुढचे 89 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
पुढचे 89 दिवस शनि देणार बक्कळ पैसा; 3 राशींना सोन्याचे दिवस, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
कोरियाला जाऊन BTS ग्रुपला भेटायचंच, धाराशिवच्या 3 मुली पळाल्या, अपहरणाचा बनाव रचला, पोलिसांनी 30 मिनिटात पकडलं
कोरियाला जाऊन BTS ग्रुपला भेटायचंच, धाराशिवच्या 3 मुली पळाल्या, अपहरणाचा बनाव रचला; पोलिसांनी 30 मिनिटात पकडलं
Virgo Yearly Horoscope 2025 : कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 खास; करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती कशी राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2025 खास; करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती कशी राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 डिसेंबर 2024 | रविवार
Libra Yearly Horoscope 2025 : तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2025 भाग्याचे; करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती कशी राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2025 भाग्याचे; करिअर, आरोग्य, आर्थिक स्थिती कशी राहील? वाचा वार्षिक राशीभविष्य
Embed widget