Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान आज (7 नोव्हेंबर) आमदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सत्ताधारी आणि विरोधी भाजपच्या आमदारांनी एकमेकांची कॉलर पकडून एकमेकांना धक्काबुक्की केली. सभागृहात गदारोळ झाल्यानंतर सभापतींनी विधानसभेचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब केले. लंगेटचे आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम 370 मागे घेण्याचा बॅनर सभागृहात फडकावला. बॅनरवर लिहिले होते, 'आम्हाला कलम 370 आणि 35A पुनर्स्थापित करायचे आहे आणि सर्व राजकीय कैद्यांची सुटका हवी आहे. याला भाजप आमदार आणि विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी विरोध केला. आणि विरोधात घोषणाबाजी सुरू केली.
सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधकांमध्ये जोरदार बाचाबाची
भाजप आमदारांच्या निषेधाची मालिका इथेच थांबली नाही. त्यांनी हाऊसमधील वेलमध्ये खुर्शीद अहमद शेख यांच्याकडे पोहोचून त्यांच्या हातातील बॅनर हिसकावून घेतला. यावेळी शेख यांच्या समर्थनार्थ सज्जाद लोन आणि वाहिद पारा आणि नॅशनल कॉन्फरन्सचे काही आमदार भाजप आमदारांशी भिडले. यावेळी बॅनर फाडण्यावरून सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांची कॉलर पकडून बॅनर हिसकावून घेण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढत असल्याचे पाहून मध्यस्थी करणाऱ्या मार्शलनी भाजप आमदारांना सभागृहाबाहेर काढले.