Captain Kharat Bhondu Baba : नाशिक- भोंदूबाबाचं धक्कादायक कांड, महिलेशी गैरवर्तन, व्हिडीओ समोर
नाशिक : अशोक खरात (Ashok Kharat) उर्फ कॅप्टन या भोंदूबाबाचं आणखी एक मोठं कांड समोर आलं आहे. सगळी लाजलज्जा सोडत या भोंदूबाबानं धार्मिक विधीच्या नावाखाली स्वत:च्या ऑफिसमध्येच एका महिलेशी अश्लील चाळे केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत आधी हा भोंदूबाबा महिलेच्या डोक्यावर तांब्या ठेवून धार्मिक विधीचे ढोंग करतोय आणि त्यानंतर तिथेच महिलेशी गैरवर्तन करताना दिसतोय. त्याचा मुर्दाडपणा इतका आहे की केबिनबाहेर लोक बसलेले आहेत, याचीही त्याला पर्वा नाही. 2024 मधला हा व्हिडीओ असल्याचं सांगण्यात येत आहे.
एका महिलेला पूजा करण्याच्या बहाण्याने गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार झाल्याची तक्रार नाशिकमध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकरणी अशोक खरातवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 2022 ते 2024 या दरम्यान, अशोक खरातने अशा आणखी किती महिलांना फसवलं आहे याचा तपास सुरू आहे. त्यानंतर त्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला.
अशोक खरातने त्याच्या ऑफिसमध्ये धार्मिक विधीच्या नावाखाली महिलेला बोलावलं आणि नंतर तिच्याशी अश्लील चाळे केले. या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आला आहे.
Nashik Ashok Kharat Case : सहा दिवसांची पोलीस कोठडी
नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला पोलिसांनी अटक केली आहे. या भोंदूबाबाला बुधवारी नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आलं, त्याला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या मांत्रिकाने गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या




















