Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
अहिल्यानगर
मुंबईच्या आझाद मैदानावर कला शिक्षक भरतीसाठीच्या सुरू असलेल्या कला शिक्षकांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अहिल्यानगरच्या स्माईलींग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेने एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे... अहिल्यानगरच्या छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी हे आंदोलन सुरू असून आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली...जवळपास मागच्या पंधरा वर्षांपासून राज्य सरकारकडून कला शिक्षकांची भरती करण्यात आलेली नाही...यंदाच्या शिक्षक अभियोग्यता चाचणीत राज्यातील हजारो कला शिक्षकांनी सहभाग घेतला आहे, संच मान्यता प्रक्रिया देखील सुरू आहे, मात्र संचमान्यता आणि बिंदूनमावलीत कला शिक्षकांचा विचार केला गेला नसल्याने राज्यातील हजारो शिक्षक हे 12 मार्चपासून मुंबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलन करत आहेत...या आंदोलनाकडे सरकारने पाठ फिरवलीये...अडीचशे विद्यार्थ्यांमागे एक क्रीडा शिक्षक पद असे शासनाचे धोरण आहे, मात्र कला शिक्षकांच्या बाबतीत 500 विद्यार्थ्यांमागे एक कलाशिक्षक असे शासनाचे अन्यायकारक धोरण आहे. ही अन्यायकारक जाचक अट तात्काळ रद्द करावी, कला शिक्षकांचे बिंदू नामावली तात्काळ करावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.


















