एक्स्प्लोर
Sushma Andhare Phaltan Case : आपल्यासोबत एकटी येऊ का? रेकॉर्ड दाखवणार आहात का?
फलटणमधील शिवसेना (UBT) कार्यकर्ते सुशील खेडकर आत्महत्या प्रकरणी त्यांच्या बहिणीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांच्यासह पोलीस अधिकारी डॉ. अंशुमान धुमाळ (Dr. Anshuman Dhumal) आणि डीवायएसपी राहुल धस (DySP Rahul Dhas) यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. ‘तुम्हाला ज्या जनतेने निवडून दिलंय, त्यांच्यावरच तुम्हाला विश्वास नाही, हा तुमचा प्रॉब्लेम आहे,’ असा थेट सवाल खेडकर यांच्या बहिणीने पोलीस अधिकाऱ्याला केला. या प्रकरणात डॉ. अंशुमान धुमाळ, डीवायएसपी राहुल धस, दोन पीए शिंदे आणि नागटिळक, एपीआय जायपत्रे आणि पीएसआय पाटील या सहा जणांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी त्यांनी केली आहे. जोपर्यंत या अधिकाऱ्यांचे निलंबन होत नाही, तोपर्यंत तपास निःपक्षपातीपणे होणार नाही, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
विश्व
पालघर
Advertisement
Advertisement


















