एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 'राज ठाकरेंची इच्छा Congress ला सोबत घेण्याची', Sanjay Raut यांच्या दाव्याने खळबळ
मनसे (MNS) आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेतील संभाव्य युतीच्या चर्चेदरम्यान, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 'स्वतः राज ठाकरे (Raj Thackeray) यांची इच्छा आहे की, आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला (Congress) सुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे', असा दावा संजय राऊत यांनी केला. यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी तात्काळ नाराजी व्यक्त करत राऊत यांचा दावा फेटाळून लावला आणि पक्षाची भूमिका केवळ राज ठाकरेच ठरवतात असे स्पष्ट केले. वाद वाढल्यानंतर, राऊत यांनी राज ठाकरे यांना 'मी तसे बोललो नाही' अशा आशयाचा मेसेज पाठवून सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. दुसरीकडे, काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी सावध प्रतिक्रिया देत, महाविकास आघाडीत (MVA) कोणाला घ्यायचे याचा निर्णय दिल्लीतील पक्षश्रेष्ठीच घेतील, असे म्हटले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
पर्सनल फायनान्स
राजकारण
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















