Ravindra Singhal Nagpur : विमान कंपन्या आणि रेल्वेला स्फोटाचे मेल पाठवणारा जगदीश उईके कोण?
Ravindra Singhal Nagpur : विमान कंपन्या आणि रेल्वेला स्फोटाचे मेल पाठवणारा जगदीश उईके कोण?
विमान कंपन्या आणि रेल्वेला स्फोट घडेल अशी माहिती देणारे ईमेल पाठवणाऱ्या जगदीश उईके नामक आरोपीचा नागपूर पोलीस शोध घेत आहे.. मात्र अद्यापही त्याला अटक झालेली नाही... जगदीश उईकेने गेल्या काही दिवसात रेल्वेला केलेले ई-मेल संदर्भात तपासात काही महत्त्वाचे मुद्दे पोलिसांचे हाती लागले असून त्या अनुषंगाने चौकशी पुढे जात असल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी दिली... जगदीश उईके चा लॅपटॉप आणि संगणक जप्त झाल्यानंतरच पुढील माहिती मिळू शकेल असे सिंगल म्हणाले... दरम्यान, त्याने आजवर किती ईमेल किंवा बोगस कॉल केले आहे याचाही तपास सुरू असल्याचे सिंगल म्हणाले... कोण आहे जगदीश उईके - जगदीश उईके हा गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव तालुक्यातील ताडगाव येथील रहिवासी आहे... मात्र, 2016 पासून तो गोंदिया सोडून गेलेला होता.. त्याने गोंदिया मधील त्याचे घरही विकले होते.. तसेच तो आपल्या आई-वडिलांसोबतही राहत नव्हता... 2016 पासून तो कुठे आहे हे अद्याप स्पष्ट नाही... 2021 मध्ये त्याला एका वेगळ्या प्रकरणात पकडण्यात आले होते, मात्र त्यानंतर तो कुठे आहे, याची कोणालाच माहिती नाही... * विमान कंपन्या, वेगवेगळे विमानतळ आणि रेल्वेला धमकीचे ईमेल पाठविणारा 35 वर्षांचा जगदीश उईके गोंदियाचा असून त्याने दहशतवादावर एक पुस्तकही लिहिलेला आहे.. * गेल्या काही दिवसांत देशातील अनेक विमानतळांना बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचे ईमेल आले होते.. त्यामुळे तपासणी आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे अनेक विमानाच्या उड्डाणाला उशीर होऊन विमान कंपन्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते.. * नुकतच तशाच आशयाचे ई-मेल रेल्वेमंत्री यांच्यासह रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वेशी संबंधित अनेक कार्यालयांमध्ये आले होते... * मी एक टेरर कोड डी कोड केला आहे असा दावा त्या ई-मेलमध्ये करून पुढील पाच दिवसात देशातील विविध रेल्वे स्टेशन आणि रेल्वे विभागाच्या परिसरामध्ये 30 पेक्षा जास्त स्फोट होतील असा आशय त्या ई-मेलमध्ये होता.... * या संदर्भात जेव्हा सुरक्षा यंत्रणांनी सखोल तपास केलं... तेव्हा या ईमेल मागे जगदीश उईके नावाचा तरुण असल्याचे समोर आले.... * जगदीश उईके हा मूळचा गोंदिया चा असला तरी सध्या तो गोंदिया मधून बेपत्ता आहे... * विशेष म्हणजे जगदीश उईके ला 2021 मध्ये पोलिसांनी धमकीचे इ मेल: प्रकरणी अटक केली होती... त्यावेळच्या चौकशीत जगदीश उईके मानसिक अस्थिर असल्याची बाब तपास यंत्रणांच्या लक्षात आली होती... * सध्या जगदीश उईके चे शेवटचे लोकेशन दिल्लीतील कनाट प्लेस मध्ये मिळाली होती.. सध्या दिल्ली, नागपूर आणि गोंदिया मध्ये त्याचा शोध घेतला जात असल्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती आहे...