एक्स्प्लोर
Raj Thackeray on Marathi language | अमराठींना इशारा, हिंदीचा धोका, Mumbai मतदारसंघ षड्यंत्र
राज ठाकरे यांनी राज्यातील अमराठी लोकांना इशारा दिला आहे. हिंदी भाषेबाबतही त्यांनी आपले मत मांडले. महाराष्ट्रात शांतपणे राहावे आणि मराठी शिकावे असे आवाहन त्यांनी केले. "महाराष्ट्रमध्ये राहताय शांतपणे राह. मराठी शिका आमचं काही वावडं नाहीये, वावडं नाहीये. तुमच्याशी काही भांडण नाहीये. पण मस्ती करणार असाल इथे तर महाराष्ट्राचा धडका बसणार म्हणजे बसणार एवढं लक्षात ठेवावय," असे त्यांनी स्पष्ट केले. हिंदी ही दोनशे वर्षांपूर्वीची भाषा असून, तिने जवळपास अडीचशे भाषा संपवल्याचा आरोप त्यांनी केला. हे एक षड्यंत्र असल्याचे त्यांनी म्हटले. मुंबईला हात लावायचा असेल तर मिराभाईंदरपासून पालघरपर्यंतचे मतदारसंघ अमराठी लोकांचे करण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. गेले वीस वर्षे आपण याबद्दल ओरडून सांगत असल्याचे त्यांनी नमूद केले. नुसती माणसे येत नसून, इमारती उभारल्या जात आहेत आणि बाहेरची माणसे येऊन मतदारसंघ बनवत आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नट-नट्यांचे भले झाले यापलीकडे हिंदीमुळे कोणाचे भले झाले, असा प्रश्न त्यांनी विचारला. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान येथे हिंदी बोलली जात असतानाही तेथील लोक महाराष्ट्रात नोकरीसाठी का येतात, असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्र
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
सोलापूर
राजकारण





















