एक्स्प्लोर

10-15 मिनिटांत तयार हो, माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे; CMO चा महिला डॉक्टरला कॉल, गुन्हा दाखल

यमुनानगर येथील सरकारी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरने येथील सीएमओ मंजितसिंहवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत.

यमुनानगर : हरयाणा राज्यातील यमुनानगर येथील एक खळबळजनक घटना समोर आली असून एका महिला डॉक्टरसोबत (Doctor) अश्लील वर्तणूक केल्याप्रकरणी जिल्हा मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणजे सीएमओवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. महिला डॉक्टरच्या तक्रारीवरुन पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला असून संबंधित अधिकारी फरार असल्याची माहिती आहे. पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन महिला डॉक्टराने सीएमओकडून होत असलेल्या मानसिक व शारिरीक छळाची माहिती दिली. त्यामध्ये, 10 ते 15 मिनिटांत तयार हो, माझ्यासोबत शारिरीक संबंध (Sexual) ठेवायचे, असे म्हणत मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने कार्यालयातील डॉक्टर महिलेवर दबाव टाकल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

यमुनानगर येथील सरकारी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डॉक्टरने येथील सीएमओ मंजितसिंहवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. संबंधित अधिकारी गेल्या अनेक दिवसांपासून आपणास त्रास देत आहे. तसेच, जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणत असल्याचंही म्हटलं आहे. विशेष म्हणजे महिला डॉक्टर पुराव्याचा पेनड्राईव्ह घेऊनच पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयात दाखल झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या महिलेने सर्व पुरावे पोलीस ठाण्यात दिले आहेत.

पीडित महिला डॉक्टर दलित असून मंजितसिंह याने जातीवाचक अपशब्द वापरत महिलेचा अवमान केला. तसेच, फोनवरुन अश्लील चॅटही महिला डॉक्टरला केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान, याप्रकणी, एएसपी भूपेंद्रसिंह यांनी प्रकरणाची गंभील दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर, आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शारिरीक सुखाची मागणी ( Doctor Demand sexual relation)

पीडित महिलेनं एफआयआरमध्ये म्हटलं की, मंजित सिंह हा सातत्याने विक्षिप्त आणि लज्जास्पद वर्तन करत होता, त्यामुळे सीएमओ कार्यालयात जातानाही मला भीती वाटत होती. विनाकारण ते मला ऑफिसमध्ये बोलवत होते, आणि लज्जास्पदजातीवाचक संवाद करत. 20 सप्टेंबर रोजी त्यांनी मला सातत्याने फोन केले. याबाबत आपण आईला माहिती दिली, तसेच फोनवरील संभाषण रेकॉर्डही केले आहे. दरम्यान, It’s now or never, get ready in 10 to 15 minutes असे म्हणत महिलेला शारिरीक संबंध ठेवण्यासाठी फोनवरुन बोलवल्याचं कॉल रेकॉर्डींग पुरावा म्हणून पोलिसांना देण्यात आलं आहे. तसेच, तू का घाबरत आहेत, यापुढे कुठल्याही कामासाठी माझ्याकडे येऊ नको, मी तुझी मदत करणार नाही. अन्यथा, मला तुझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवायचे आहेत, याबाबत कुणालाही बोलू नको, अशी धमकीही सीएमओने दिल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे. त्यानुसार, पोलिसांनी आरोपी मंजितसिंह विरुद्ध यमुनानगर पोलीस ठाण्यात BNS 75(2), 78 BNS, 3(1) (1) SC/ST ACT (1989) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra FDA: जुहूतील इस्कॉनच्या अन्न आस्थापनांवर FDAची मोठी कारवाई; किचनमध्ये अन्न सुरक्षा अन् स्वच्छतेच्या नियमांमध्ये गंभीर त्रुटी; 3 फूड युनिट्सचे परवाने निलंबित
जुहूतील इस्कॉनच्या अन्न आस्थापनांवर FDAची मोठी कारवाई; किचनमध्ये अन्न सुरक्षा अन् स्वच्छतेच्या नियमांमध्ये गंभीर त्रुटी 3 फूड युनिट्सचे परवाने निलंबित
Kanpur Businessman Vineet Minocha Death Case: सूनेने नोकराकडून करोडपती सासऱ्याला संपवले; कारण समोर येताच पोलिसही चक्रावले, थरकाप उडवणारी घटना
सूनेने नोकराकडून करोडपती सासऱ्याला संपवले; कारण समोर येताच पोलिसही चक्रावले, थरकाप उडवणारी घटना
Kanpur Businessman Vineet Minocha Death Case: सूनेची नोकरासोबत चॅटिंग, करोडपती व्यावसायिकाच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट, पोलिसही चक्रावले!
सूनेची नोकरासोबत चॅटिंग, करोडपती व्यावसायिकाच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट, पोलिसही चक्रावले!
Riya Talukdar Case: वर्षभराआधी लग्न, पतीने 25 वर्षीय पत्नीला संपवलं; फ्रीज उघडताच मुंडकं पाहून पोलिसही हादरले, आसाममधील थरारक कांड
वर्षभराआधी लग्न, पतीने 25 वर्षीय पत्नीला संपवलं; फ्रीज उघडताच मुंडकं पाहून पोलिसही हादरले, आसाममधील थरारक कांड

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे आदेश; अंतरवालीत दोन दिवस दारुबंदी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
जसे जरांगे पाटलांचे समर्थक, तसे आमच्या नेत्यांचेही समर्थक; जरांगे पाटलांनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंतांची मागणी
Kiran Mane Post On Jahnavi Killekar Dahi Handi Viral Video: 'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
'लोकांचे 'चॉईसेस' बदलतायत, मराठी टीव्ही-सिनेमाचं ग्लॅमर झाकोळलंय...'; जान्हवी किल्लेकर प्रणाली सूर्यवंशीच्या 'त्या' व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट
Nashik Crime news: भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या शिक्षण संस्थेतील प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू, जिन्यावरुन पाय घसरुन पडले, शिवसैनिकांना वेगळाच संशय, पोलिसांना म्हणाले...
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
इंजिनिअर हतबल, तंत्रज्ञानही अपयशी; मंदिर तोडले, मात्र हनुमानाची मूर्ती एक इंचही जागची हलली नाही, उज्जैनमधील मंदिराची देशभर चर्चा, नेमकं काय घडलं?
Sanjay Raut and Manoj Jarange Patil: राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारला मनोज जरांगे पाटलांना मारायचंय, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Manoj Jarange Patil and Eknath Shinde: मनोज जरांगेंची एकनाथ शिंदेंविषयीची 'ती' कृती मराठा समाजाला रुचलेली नाही, आम्ही अजूनपर्यंत जरांगेंचा उल्लेख 'दादा' करतोय पण.... शंभूराज देसाई काय म्हणाले?
मनोज जरांगेंची एकनाथ शिंदेंविषयीची 'ती' कृती मराठा समाजाला रुचलेली नाही, आम्ही अजूनपर्यंत जरांगेंचा उल्लेख 'दादा' करतोय पण.... शंभूराज देसाई काय म्हणाले?
Embed widget