एक्स्प्लोर
Solapur Rain: दक्षिण भारताचे प्रवेशद्वार असलेल्या सोलापुरतील सीना नदीला पूर; पाणीथेट रेल्वे पुलापर्यंत पोहचल, रेल्वे वाहतुकीवर परिणाम
Solapur: सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला आहे. यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. खबरदारी म्हणून सलग दुसऱ्या दिवशी सोलापुरातील काही भागांतील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली.
Solapur Rain
1/4

Solapur Rain : सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला आहे. यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली आहेत. खबरदारी म्हणून सलग दुसऱ्या दिवशी सोलापुरातील काही भागांतील शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. यात उत्तर सोलापूर, माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी आणि अप्पर तहसील कार्यालय मंद्रू येथील शाळांचा समावेश आहे.
2/4

सीना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रेल्वे पुलापर्यंत पाणी पोहोचले आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, या मार्गावरील रेल्वेचा वेग प्रति तास तीस किलोमीटर करण्यात आला आहे.
3/4

मुसळधार पाऊस आणि पुरामुळे रस्ते वाहतूकही ठप्प झाली आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि सोलापूर-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत. रस्ते वाहतूक बंद असल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रवासाला पसंती दिली आहे.
4/4

यामुळे सोलापूर रेल्वे जंक्शनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. सीना नदीच्या वाढलेल्या पातळीमुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोलापूर हे दक्षिण भारताचे प्रवेशद्वार मानले जाते.
Published at : 24 Sep 2025 11:33 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























