मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतलाय.. या गॅझेटनुसार आता कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. पण त्यासाठी अर्ज कसा करायचा? आणि ते प्रमाणपत्र कुठे मिळेल? याची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत..राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतलाय.. 2 सप्टेंबर 2025 रोजी सरकारने काढलेला जीआरच्या हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून आता गाव पातळीवर समिती गठित करण्यात आलेली आहे.या समितीची आता कार्यपद्धती जाहीर करण्यात आलीये. समितीचे सदस्य म्हणून ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी असतील. अर्जदारांनी कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यावर तालुका समिती गाव पातळीवरच्या समितीकडे छाननीसाठी अर्ज देईल. या छाननीच्या अहवालानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.अर्जाची प्रक्रिया कशी असेल?-कुणबी प्रमाणपत्रासाठी जात प्रमाणपत्राची प्रोसेस असेल.- अर्ज सादर झाल्यानंतर तालुकास्तरीय समिती प्राथमिक छाननी करेल.- नंतर, गाव पातळीवर गठीत स्थानिक समितीकडे चौकशीसाठी तो अर्ज पाठवला जाईल.- स्थानिक समिती, अर्जदाराची माहिती गावातील ज्येष्ठ नागरिक, पोलिस पाटील आदींच्या समक्ष पडताळून, अहवाल तयार करून तालुकास्तरीय समितीकडे पाठवेल.- तालुकास्तरीय समिती या अहवालाचा आढावा घेऊन, अर्जावर शिफारस करेल.- अंतिमतः, सक्षम प्राधिकारीकडून जात प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे-कुणबी प्रमाणपत्रसाठी अर्जदार भूधारक, भूमिहीन, शेतमजूर किंवा बटईने शेती करणारा असेल, तर त्या संबंधित जमीनधारकतेचा पुरावा सादर करणे आवश्यक.- वरील पुरावे उपलब्ध नसल्यास, अर्जदाराने 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी त्यांचे पूर्वज स्थानिक क्षेत्रात राहत होते, याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक.- अर्जदाराच्या गावातील किंवा कुळातील नातेसंबंधीत व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास, त्यांचे नातेसंबंध सिद्ध करणारे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक.- याशिवाय अर्जासोबत इतर कोणतेही पुरावे (जसे की जुनी कागदपत्रे, उत्पन्न दाखले, शालेय दाखले इ.) जोडता येतील.