Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली, 'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Dharashiv News : राज्यभरात पावसाने एकच हाहा:कार केल्याचे चित्र आहे. त्यातच मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने अक्षरशः झोडपून काढलं आहे. याच पावसाचा फटका धाराशिव जिल्ह्यातील (Dharashiv News) अनेक गावांना बसला आहे. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफच्या (NDRF) पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे बचाव कार्य सुरु आहे. अशातच धाराशिवाचे (Dharashiv News) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) हे देखील स्वतः पाण्यात उतरून पुराच्या पाण्यात अडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सरसावल्याचे बघायला मिळाले आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नाताला वाचवण्यासाठी त्यांनी थेट पाण्यात उतरून बचाव कार्यात मदत केली आहे. ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः फेसबुक पोस्ट करत याबाबतची माहिती देत एनडीआरएफ टीमचेही आभार मानले आहे. तर दुसरीकडे ओमराजे निंबाळकर यांची मदतकार्य पाहून मनसेचे नेते बाळ नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी देखील खासदार ओमराजेंचे तोंडभरून कौतुक केलं आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांची फेसबुक पोस्ट नेमकी काय?
धाराशिव जिल्ह्याच्या वडनेर ता. परंडा येथे अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील एका आजीसह 2 वर्षाचा मुलगा आणि 2 व्यक्ती रात्री 2 वाजल्यापासून पूर्ण पाण्याने वेढले होते. सोबतच स्वतःच्या घरावर अन्न व पाण्यविणा मदतीच्या अपेक्षेने ते अडकले होते. परिणामी NDRFच्या जवांनाच्या मदतीने मी स्वतः या कार्यात सहभागी होऊन कुटुंबाला सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी संध्याकाळी 8 वाजता यश आल्याने मनाला खूप समाधान मिळाले..! या कार्यात NDRFच्या जवानांनी आणि गावकऱ्यांनी देखील कष्ट आणि मेहनत घेऊन सदरील बचावकार्य यशस्वीरित्या पार पाडले, याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व अभिनंदन..!
महत्त्वाच्या बातम्या


















