![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Rain Rescue Operation : नागरिकांचं बोटीतून बचावकार्य; महिला-मुलांमध्ये भितीचं वातावरण
Pune Rain Rescue Operation : नागरिकांचं बोटीतून बचावकार्य; महिला-मुलांमध्ये भितीचं वातावरण
ही बातमी पण वाचा
Pune Rains: वीर धरणातून नीरा नदीपात्रात ३२ हजार ४५९ क्युसेकने विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Pune Rains: नीरा नदीच्या खोऱ्यात सध्या पावसाची संततधार सुरु असून आज वीर धरणातून (Vir Dam) ३२ हजार ४५९ क्युसेकने विसर्ग सुरु करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नीरा आणि भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज राज्यभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून (Pune Rains) पुण्यात अतिवृष्टीची नोंद होत आहे. दरम्यान, पुण्यातील धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात येत आहे. दरम्यान पुण्यातील पुरंदर तालुक्यातील वीर धरणातून हा विसर्ग करण्यात आला आहे.
सध्या नीरा खोऱ्यात देखील जोरदार पाऊस सुरु असल्याने या खोऱ्यातील वीर धरण 85 टक्के भरल्याने येथूनही पाणी सोडले जाणार आहे. भाटघर 67 टक्के, नीरा देवघर 60 टक्के आणि गुंजवणी 71 टक्के भरले आहे. वीर धरणातून आता पाणी सोडण्याचा इशारा दिला असून याचा उजनीला काही फायदा होत नसला तरी हे पाणी चंद्रभागेत येत असल्याने चंद्रभागेच्या पाणीपातळी वाढण्याची शक्यता आहे.
वीर धरणपरिसरात पावसाची संततधार
पुण्यात मुसळधार पावसाने हाहाकार उडाला असून जनजीवन विस्कळीत झाली आहे. पुण्यात (Pune Rain Update) रात्रभर मुसळधार पाऊस आणि त्याचवेळी खडकवासला धरणातून (Khadkwasla Dam) झालेला 40 हजार क्युसेकचा विसर्ग यामुळे पुण्यात भयानक पूरस्थिती उद्भवली आहे. पुण्यात पुरंदर तालुक्यातील वीर धरण परिसरात पावसाची संततधार असून आता या धरणातून विसर्ग सोडण्यात आला असून भीमा आणि नीरा नदीपरिसरातील गावांना सतर्क राहण्यास सांगण्यात आलं आहे.
![Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/5ac90fad88155f26d93bf679365912be1732338634059718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Maharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/2e61fc0adddf555b5dce5feb73564c541732336363566718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/6313a66b0ba8914fd14405a53aa359711732299586714976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/52cfa45400bef72d299cb6c1fd5001661732298997936976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/a7e89883d4673f8d39a903504d7d67951732299129376976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)