Ahmednagar City Assembly Constituency : दादांच्या संग्राम जगतापांची अहमदनगरमध्ये हॅटट्रिक ! अभिषेक कळमकरांचा 39 हजार मतांनी पराभव
Sangram Jagtap Ahmednagar City Assembly constituency 2024 : सहकार क्षेत्राचा बालेकिल्ला आणि साधुसंतांची भूमी म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे नाव घेतले जाते.
Maharashtra Assembly Election 2024 : सहकार क्षेत्राचा बालेकिल्ला आणि साधुसंतांची भूमी म्हणून अहमदनगर जिल्ह्याचे नाव घेतले जाते. ऐतिहासिक पार्श्वभूमी, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा असलेला हा जिल्हा राज्याच्या राजकारणातही महत्वाचा मानला जातो. त्यामुळे अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघ नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. दरम्यान, अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या सामन्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संग्राम जगताप हे 39 हजार 650 मतांनी विजयी झाले आहे. त्यामुळे आमदार संग्राम जगताप यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. महाविकास आघाडीच्या एकसंघ होती, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना 78 हजार 255 मिळाले. पहिला फेरीपासून संग्राम जगताप यांनी आघाडी घेतली होती. ती आघाडी शेवटच्या फेरी अखेरपर्यंत कायम ठेवली आणि विजय निश्चित केला.
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांच्यात सरळ लढत रंगली होती. गेली दोन टर्म सत्ता काबिज केल्यानंतर आमदार जगताप यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला राष्ट्रवादीचा केला आणि तिसऱ्या टर्मसाठी जगताप यांनी जोरात तयारी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार कळमकर यांचा पराभव केला.
अहमदनगर शहर विधानसभेत 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत झाली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम अरुण जगताप 81,217 मतांनी विजयी झाले (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) होते.अनिल रामकिसन राठोड यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर संग्राम जगताप यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याआधी म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अहमदनगर शहरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनेच गुलाल उधळला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संग्राम जगताप 49 हजार 378 मतांनी विजयी झाले होते. तर अनिल राठोड यांना पराभव पत्करावा लागला होता.
हे ही वाचा -
Sharad Pawar: राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही