एक्स्प्लोर
PM Modi On Mohan Bhagwat | सरसंघचालक मोहन भागवतांच्या कार्याचं नरेंद्र मोदींकडून कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. मोहन भागवत यांच्या पंचाहत्तरीनिमित्त पंतप्रधान मोदींनी एक विशेष लेख लिहिला आहे. या लेखात मोदींनी म्हटले आहे की, "संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासातील भागवतजींचा कार्यकाळ हा सर्वात परिवर्तनकारी आहे." मोहन भागवत यांनी सरसंघचालकांच्या जबाबदारीला पूर्ण न्याय दिला आणि तिला व्याप्ती दिली. सातत्य आणि जुळवून घेणं हे दोन गुण त्यांनी त्यांच्या कार्यशैलीत आत्मसात केले आहेत. त्यांनी अधिकाधिक तरुणांना संघ परिवारात आणले. मोहन भागवत यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रशंसनीय गुण म्हणजे त्यांचा मृदुभाषी स्वभाव आणि श्रवणाची अपवादात्मक क्षमता. मजबूत आणि समृद्ध राष्ट्रासाठी आवश्यक असलेला स्पष्ट दृष्टीकोन आणि निर्णायक कृती या दोन्ही गुणांनी ते परिपूर्ण आहेत. अत्यंत व्यग्र वेळापत्रकातही मोहन भागवत संगीत आणि गायन हे छंद जोपासण्यासाठी वेळ काढतात. ते कित्येक भारतीय संगीत वाद्य वाजवण्यात पारंगत आहेत. त्यांची वाचनाची आवड त्यांच्या अनेक भाषणांमधून आणि संवादातून दिसून येते. मोहन भागवत हे वसुधैव कुटुंबकम या विचारधारेचे मूर्तिमंत उदाहरण आहेत.
महाराष्ट्र
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष : शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

महेश गलांडे
Opinion

















