एक्स्प्लोर
Farmer Suicide | चंद्रपूरमध्ये Farmer Suicide, Dhanorkar कुटुंबावर गंभीर आरोप; कुटुंबियांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्या करणारे परमेश्वर मेश्राम यांचा मृतदेह अजूनही शवगृहात आहे. कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. "जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आम्ही मृतदेहावरती अंत्यसंस्कार करणार नाहीत," अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे. परमेश्वर मेश्राम यांच्या मृत्यूस काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि त्यांचे सासरे अनिल धानोरकर जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. आमच्या शेतजमिनीचा सातबारा आमच्या नावावर करावा, धानोरकर कुटुंबियांकडून ताबा मिळवून घ्यावा आणि पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. मेश्राम यांच्या पप्पांनी शेती विकली होती, एक लाखाचा चेक बाउंस झाला. कोर्टात केस जिंकूनही तहसीलदारांनी सातबाराचा फेरफार करून दिला नाही. बाळुभाऊ धानोरकर यांच्या दबावाखाली हे घडल्याचे कुटुंबियांना वाटते. धानोरकर कुटुंबियांकडून जमिनीचा ताबा मिळवून देण्याची मागणीही आहे. अनिल धानोरकर यांनी या जमिनीशी आपला वाद परमेश्वर मेश्राम यांच्यासोबत नसल्याचे म्हटले आहे. प्रशासनाकडे काही प्रश्नांची उत्तरे संदिग्ध आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
छत्रपती संभाजी नगर
भारत
बॉलीवूड
Advertisement
Advertisement























