RSS Shatabdi Varsh नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नागपुरात आज (27 सप्टेंबर रोजी) ऐतिहासिक पथसंचलन होणार आहे. हे पथसंचलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) नागपूरमधील आतापर्यंतचे सर्वात मोठे पथसंचलन असेल. 27 सप्टेंबर 1925 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती. या स्थापनेच्या औचित्याने या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पथसंचलनासाठी स्वयंसेवकांचे तीन पथक वेगवेगळ्या स्थानांवरून मार्गक्रमण करतील. पहिले पथक अमरावती मार्गावरील हॉकी मैदान येथून निघेल. यामध्ये त्रिमूर्तिनगर, धरमपेठ, गिट्टीखदान आणि सोमलवाडा भागातील स्वयंसेवक सहभागी होतील. दुसरे पथक कस्तुरचंद पार्क येथून पथसंचलन सुरू करेल. या पथकाचे संचलन 2.9 किलोमीटरचे असेल. मोहितेश आहाल, लालगंज, बिनाकी आणि सदर भागातील स्वयंसेवक यात सहभागी होतील. तिसरे पथक यशवंत स्टेडियममधून पथसंचलन सुरू करेल. यात इतवारी, अजनी, अयोध्या नगर आणि नंदनवन परिसरातील स्वयंसेवक सहभागी होतील. हे पथसंचलन संघाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण म्हणून पाहिले जात आहे.
RSS शताब्दी वर्षानिमित्त ऐतिहासिक पथसंचलन, ऐतिहासिक महत्व (RSS Centenary Path Sanchalan)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये पथसंचलनाचा मोठा इतिहास आहे. 27 सप्टेंबर 1925 रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाल्यापासून पथसंचलन नियमितपणे होते. आज नागपुरात होणारे संघाचे पथसंचलन शताब्दी वर्षाचे आहे. हे पथसंचलन डॉ. हेडगेवार यांच्या काळात ज्या मार्गातून होत होते, त्याच मार्गावरून आज होणार आहे. संघाच्या इतिहासाचे जाणकार डॉ. भालचंद्र हरदास यांनी याला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, 'एका प्रकारे डॉक्टर हेडगेवार यांचा तेव्हाचा जो केशवीय मार्ग होता, त्याच मार्गाचं अनुकरण आज नागपुरात हजारो स्वयंसेवक करणार आहेत.





















