एक्स्प्लोर

Vaibhav Khedekar: राज ठाकरेंनी मनसेतून हाकललं, भाजप पक्षात घेईना, वैभव खेडेकरांवर नेत्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ

Vaibhav Khedekar & Raj Thackeray: राजकृपेचा वरदहस्त गेला, वैभव खेडेकरांचं राजकीय वजन घटलं. भाजप पक्षप्रवेशासाठी आता ते नेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत.

Vaibhav Khedekar News: गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या संपर्कात असल्याची चर्चा असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) कोकणातील नेते वैभव खेडेकर यांचे राजकीय ग्रह सध्या प्रतिकूल असल्याचे चित्र दिसत आहे. एकेकाळी राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेल्या वैभव खेडेकर यांची अलीकडच्या काळात भाजप आणि शिंदे गटाशी जवळीक वाढली होती. यानंतर वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चितही केले होते. ही बातमी पसरताच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वैभव खेडेकर यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. परंतु, त्यानंतर वैभव खेडकर यांचा भाजप(BJP) प्रवेश लवकरच पार पडेल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, अनेक दिवस उलटूनही भाजपमध्ये त्यांचा प्रवेश होऊ शकलेला नाही. त्यांच्या भाजप पक्षप्रवेशात माशी नक्की कुठे शिंकली, हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, या सगळ्यामुळे वैभव खेडेकर यांची मानसिक चलबिचल वाढल्याचे सांगितले जात आहे.

भाजपने अद्याप वैभव खेडेकर यांना मुंबईत पक्षप्रवेशासाठी बोलावून घेतलेले नाही. जवळपास तीनवेळा त्यांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त लांबवणीवर पडला. त्यामुळे आता वैभव खेडेकर यांनी स्वत:हूनच मुंबईत येत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. वैभव खेडेकर यांनी बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रवीण दरेकर यांची भेट घेतली. या भेटीगाठींचे कारण अद्याप समोर आलेले नाही. वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश कधी होणार, याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. या पक्षप्रवेशासाठी वैभव खेडेकर यांना सध्या भाजप नेत्यांच्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. एकेकाळी कोकणातील मनसेचे ताकदवान नेते म्हणून वैभव खेडेकर यांची ओळख होती. मात्र, आता 'राज'कृपेचा वरदहस्त दूर झाल्याने खेडेकर यांची अवस्था बिकट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Khed Nagarparishad: वैभव खेडेकरांना स्थानिक राजकारणात धक्का

राज ठाकरेंनी मनसे स्थापन केल्यापासून वैभव खेडेकर त्यांच्याबरोबर होते. इतकंच नाही तर खेड नगरपरिषद निवडून आणण्यात वैभव खेडेकर यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते यापूर्वी खेडचे नगराध्यक्ष होते. मात्र, यंदा खेडचे नगराध्यक्षपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने स्थानिक पातळीवरही खेडेकर यांना धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

आणखी वाचा

राजसाहेब आपण फार घाई केली, तुम्ही कालही मनात होता आणि उद्याही राहाल; मनसेतून हकालपट्टी होताच वैभव खेडेकर भावूक

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Shiv Sena Symbol Case : राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
राहुल नार्वेकरांचे सगळेच निर्णय चुकले, सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलांचा धडाधड युक्तिवाद; आजच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget