एक्स्प्लोर
Phaltan Doctor Case: ‘तुमच्या तपासावर विश्वास कसा ठेवायचा?’, Sushma Andhare यांचा पोलिसांना सवाल
फलटण (Phaltan) डॉक्टर आत्महत्या प्रकरणी शिवसेना (UBT) नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले. 'तुषार दोषींनी (Tushar Doshi) ठरवून कॅरेक्टर असेस्सिनेशन (Character Assassination) करण्यासाठी माणसं बोलावली का?', असा थेट सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. पीडितेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न होत असताना SP तुषार दोषी गप्प का बसले, असा प्रश्न त्यांनी विचारला. DYSP राहुल धस (Rahul Dhas), डॉ. अंशुमन धुमाळ (Dr. Anshuman Dhumal), API जय पात्रे (Jay Patre) आणि PSI पाटील यांच्यासह सहा जणांवर आरोपपत्र कधी दाखल करणार, अशी विचारणा करत पोलिसांच्या तपासावर अविश्वास दाखवण्यात आला. इन-कॅमेरा पोस्टमार्टम न करणे आणि CDR लीक होण्यासारख्या मुद्द्यांवरूनही अंधारे यांनी पोलिसांना जाब विचारला. जोपर्यंत आरोपी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















