एक्स्प्लोर
Pankaja Munde : 'मीच गोपीनाथ मुंडेंची खरी वारस', पंकजा मुंडेंचा थेट इशारा
बीडमधील दीपावली स्नेह मिलन कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ कारखाना आणि गोपीनाथ मुंडे यांच्या वारसा हक्कावरून एक महत्त्वाचे विधान केले आहे. 'वैद्यनाथ कारखाना हा गोपीनाथ मुंडेंचा आत्मा आहे, तो माझा आत्मा आहे कारण मी गोपीनाथ मुंडेंची वारस आहे,' असे पंकजा मुंडे म्हणाल्या. गेल्या काही दिवसांपासून मुंडे यांच्या वारसा हक्कावरून सुरू असलेल्या चर्चेला त्यांनी उत्तर दिले. नाव न घेता आपल्या राजकीय विरोधकांवर टीका करताना त्या म्हणाल्या की, तो आत्मा वाचवण्यासाठी कारखाना विकावा लागला असता तरी काही लोकांनी तो विकला असता, पण मी तो विकला नाही. गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या या कारखान्यावरून आणि त्यांच्या राजकीय वारशावरून पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















