चंद्रपूर : कोरोना, बेरोजगारीमुळे जंगलात जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ, वाघाच्या हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात आज वाघाच्या हल्ल्यात मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा मृत्यू झाल्याची अतिशय दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. सिंदेवाही तालुक्यातील पवनपार गावालगतच्या जंगलात आज सकाळी मोहफुल वेचण्यासाठी गावातील लोकं गेले होते आणि त्याच वेळी वाघाने कमलाकर उंदीरवाडे आणि धुर्वास उंदिरवाडे यांना हल्ला करून ठार केले. एकाच वेळी वाघाने दोन लोकांना ठार केल्याची ही घटना अतिशय दुर्मिळ असून या मुळे परिसरात मोठी दहशत पसरली आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यात वाघाच्या हल्ल्यात तब्बल 9 लोकांचा मृत्यू झालाय आणि त्यामुळे पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष वाढल्याचं चित्र आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज



















