Nilesh Rane on Kiran Samant : निवडणुकीत किरण सामंतांनी ठाकरेंना भेटले; राणे कुणालाच सोडत नाही
Uday Samant On Nilesh Rane: आम्ही सर्व गोष्टी लक्षात ठेऊन आहोत, राणे कुणालाच माफ करत नाहीत, असं म्हणत भाजपचे निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे बंधू किरण सामंत (Kiran Samant) यांच्यावर गंभीर आरोपही केला आहे. निवडणुकीच्या काळात किरण सामंत हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना भेटल्याचा दावा निलेश राणे यांनी केला आहे. तसेच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा पारंपारिक मतदारसंघ आहे. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून राजापूर आणि रत्नागिरी विधानसभा आमच्याकडे यावेत, अशी मी मागणी देखील निलेश राणेंनी केली आहे.
निलेश राणेंच्या या विधानानंतर महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मतदारसंघ कुणाला सोडायचा, कोण उमेदवार असेल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपमधून देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीकडून अजित पवार ठरवतात. लोकशाहीमध्ये कोणालाही कुठलाही मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे. निर्णय नेतेमंडळी घेत असतात. मी महायुतीतला एक जबाबदार मंत्री आहे, त्यामुळे मला यातून वाद वाढवायचा नाही. त्यांच्या मताचा मी आदर करतो, असं म्हणत उदय सामंत यांनी निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं. तसेच मी प्रामाणिकपणे काम करतो. त्यामुळे मला कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही, असंही उदय सामंत म्हणाले.
उदय सामंत लीड देऊ शकले नाही-
उदय सामंत पालकमंत्री आहेत. पालकमंत्री म्हणून त्यांनी जी डिलिव्हरी करायला हवी होती ती त्यांनी केली नाही. उदय सामंत यांच्या विधानसभा मतदारसंघात आम्ही मायनस आहोत. उदय सामंत या बाबत बोलतील ते का लीड देऊ शकले नाहीत. आम्ही रत्नागिरीमधून अपेक्षा ठेवली होती. उदय सामंत एक सिनियर लीडर आहेत, पण त्यांच्याकडून आम्हाला आकडे दिसले नाहीत.
![Top 50 News : टॉप 50 : बातम्यांचं अर्धशतक : ABP Majha : 02 Feb 2025 : Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/ad01b773a64b9d152db0ee078a3e1d161738482340764718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Pandharpur Vitthal Rakhumai Marriage : पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मातेचा स्वर्गीय विवाह सोहळा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/87f9cc39e253748f80ecb19eaee7a5321738482285082718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 12 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 02 Feb 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/814f6001125494b152235e82368bba1a1738480945378718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 02 Feb 2025 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/2649a8bd3f384fcd89b1d7729d7fb46d1738480397304718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sanjay Raut PC शिंदे खासगीत सांगतात विधानसभेनंतर मीच मुख्यमंत्री राहीन असं वचन दिलेलं म्हणून फुटलो..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/02/81117d6f101c663556c6eb279c4144f21738480001149718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)