Nanded Weekend Lockdown | नांदेडमध्ये वीकेंड लॉकडाउनचा फज्जा
राज्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने ही कोरोना साखळी तोडण्यासाठी वीकेंड लॉकडाउनची घोषणा करण्यात आलीय. काल मध्यरात्री पासून हा वीकेंड लॉकडाऊन सुरू झाला असून आज या वीकेंड लॉकडाऊनचा पहिला दिवस आहे. या वीकेंड लॉक डाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी, आरोग्य कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त आणि महत्वाचा कामा खेरीज कोणीही बाहेर फिरू नये असे आवाहन करण्यात आलंय. मात्र नांदेड जिल्ह्यात या वीकेंड लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. कारण नांदेड जिल्ह्यातील बाजार पेठेत व रस्त्यावर नागरिकांची व वाहनांची मोठया प्रमाणात गर्दी पहावयास मिळत आहे.,त्यामुळे राज्य शासनाने घोषणा केलेल्या वीकेंड लॉक डाऊन चा नांदेडकरांनी फज्जा उडाल्याचे चित्र आहे.


















