Nana Patole PC | राज्यात महायुतीचे सरकार, नाना पटोलेंनी दिल्या फडणवीसांना शुभेच्छा
Nana Patole PC | राज्यात महायुतीचे सरकार, नाना पटोलेंनी दिल्या फडणवीसांना शुभेच्छा
स्वातंत्र्याच्या लढाईत ब्रिटिशांना साथ देणारे संबित पात्राच्या पक्षाचे पुर्वजच खरे गद्दार व देशद्रोही: नाना पटोले अदानीच्या भ्रष्टाचारावर चर्चेची मागणी केल्यानेच भाजपाकडून राहुल गांधींची बदनामी, भाजपाने काहीही केले तरी ‘अदानी मोदी भाई भाई ! पाकिस्तानात न बोलताच बिर्याणी खाणारे, ISI ला भारतात पायघड्या घालणारेच देशद्रोही.. मुंबई, दि. ६ डिसेंबर २०२४ लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अदानीच्या भ्रष्टाचारावर चौकशी करण्याची मागणी करताच अदानीचे दलाल राहुल गांधींची बदनामी करु लागले आहेत. जेव्हा जेव्हा अदानीच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केले जाते तेव्हा तेव्हा अदानीचे दलाल भाजपाचे नेते काँग्रेस व राहुल गांधी यांच्यावर बेछुट आरोप करतात. आताही भाजपाचा टुकार खासदार संबित पात्राने राहुल गांधी यांना देशद्रोही व गद्दार म्हणून अकलेचे तारे तोडले आहेत. वास्तविक पाहता स्वातंत्र्याच्या लढाईत ब्रिटिशांना साथ देणारे संबित पात्राच्या पक्षाचे पुर्वजच खरे गद्दार व देशद्रोही आहेत असा घणाघाती हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. भाजपा खासदार संबित पात्राच्या विधानाचा तीव्र निषेध करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपाची पोलखोल केली, ते पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत काँग्रेसने मोठे योगदान दिले आहे. देश ब्रिटिशांशी लढत होता तेव्हा संबित पात्राच्या पक्षाचे पूर्वज ब्रिटीशांची साथ देत होते हा इतिहास आहे. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यात अनेकदा तुरुंगवास भोगला, पंडित जवाहलाल नेहरु यांनी ११ वर्षे तुरुंगवास भोगला, इंदिराजी गांधी, राजीवजी गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले आणि देशाची एकता व अखंडता अबाधित रहावी यासाठी राहुल गांधी यांनी देशभर पदयात्रा काढून देश जोडण्याचे काम केले, त्यावेळी भारतीय जनता पक्ष धार्मिक तेढ निर्माण करून देश तोडण्याचे पाप करत होता. अशा विभाजनकारी विचारसरणीचे लोकच देशाचे खरे गद्दार व देशद्रोही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रण नसताना पाकिस्तानात ‘बिन बुलाये मेहमान’ म्हणून गेले व नवाज शरिफ यांची बिर्याणी खाऊन आले. मोदी सरकारनेच पाकिस्तानच्या आयएसआय ला भारतात पायघड्या घातल्या ते देशद्रोही कृत्त नाही का? भारताविरोधात घातपाती कारवाया करणाऱ्या दहशवाद्याला भाजपाच्या वाजपेयी सरकारने कंधारला सुरक्षित सोडून दिले त्याला देशद्रोही म्हणायचे नाही तर काय? याची उत्तरे भाजपा व संबित पात्राने द्यावीत. संबित पात्रा याची राहुल गांधींवर बोलण्याची पात्रता नाही पण ‘अदानी मोदी भाई भाई’ असल्यामुळे मालकाच्या इज्जतीखातर पात्रा बोलून गेला पण त्याला भाजपाचा खरा इतिहास माहित नसावा असेही नाना पटोले यांनी म्हटले. आमच्या नेत्यांची बदनामी कराल तर त्याला जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही पटोलेंनी यांनी दिला.