Monsoon Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 2 सप्टेंबर 2024 : ABP Majha
Monsoon Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 7 PM : 2 सप्टेंबर 2024 : ABP Majha
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस राहिले असताना राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळतोय. मराठवाड्यात पावसाने कहर केला असून मागील 24 तासांपासून होणाऱ्या मुसळधार पावसानं मराठवाड्यातील 420 महसूल मंडळांपैकी 240 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. मराठवाड्यात पावसानं हैदोस घातला असून अर्ध्या मराठवाड्यात अतिवृष्टीची नोंद झाल्यानं दाणादाण उडाली आहे. यात लातूर जिल्ह्यात एक जण पुरात वाहून गेल्याच सांगण्यात आलंय.
अरबी समुद्रात असणाऱ्या सक्रिय कमी दाबाचा पट्ट्यानं मराठवाडा विदर्भात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली असून नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेत.
कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस झाला?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 47 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून 60 मंडळात तुफान पावसानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. नांदेड जिल्ह्यात 42 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून परभणीत तब्बल 50 महसूल मंडळे अतिवृष्टीने बेहाल झाले आहेत.