Dilip Walse Patil : न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो, धनंजय मुंडेंबाबत...; दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Dilip Walse Patil on Dhananjay Munde : गेल्या काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होत आहे. यावर दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाचं भाष्य केलंय.
Dilip Walse Patil on Dhananjay Munde : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण (Santosh Deshmukh Murder Case) सध्या राज्यभरात चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणात सात आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडला (Walmik Karad) अटक करण्यात आली. वाल्मिक कराडसह हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तसेच विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जात आहे. यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, न्यायालयाने निर्णय दिला तर तो दोषी होतो. धनंजय मुंडे यांच्या बाबतीत केवळ आरोप होत आहेत. जर त्याबाबत काही सिद्ध झालं तर पुढचा निर्णय नंतर घेता येतो. मात्र धनंजय मुंडे यांच्याबाबत केवळ आरोप होत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
छगन भुजबळ अधिवेशनाला येतील : दिलीप वळसे पाटील
दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना राज्याच्या मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. त्यामुळे छगन भुजबळ यांनी कमालीची नाराजी व्यक्त केली होती. छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला होता. तर गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढत असल्याचे दिसून आले होते. यामुळे छगन भुजबळ राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यातच आज शिर्डी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनाला छगन भुजबळ उपस्थित राहणार का? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. यावरही दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाचं भाष्य केलंय. छगन भुजबळ अधिवेशनाला येतील, असे त्यांनी म्हटले आहे. आता छगन भुजबळ अधिवेशनाला उपस्थित राहणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
...तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढायला तयार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाने स्वबळाचा नारा दिलाय. त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महायुतीतील मित्रपक्ष एकत्र लढणार की स्वबळावर लढणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती एकत्र लढली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढायला देखील तयार आहे, असे त्यांनी म्हटले. दिलीप वळसे पाटलांच्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
आणखी वाचा
Walmilk Karad : वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी, जेल की बेल? कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष