Milk Tanker Accident : भिवंडी-पारोळ मार्गावर दुधाच्या टँकरचा अपघात, दूध शेतात वाहून लाखोंचे नुकसान
Milk Tanker Accident : भिवंडी-पारोळ मार्गावर दुधाच्या टँकरचा अपघात, दूध शेतात वाहून लाखोंचे नुकसान
भिवंडी पारोळ राज्य महामार्गावर दुधाने भरलेला टँकर भिवंडीच्या दिशेने येत असताना आमराई खडकी बुद्रुक गावाच्या हद्दीत आला असता रस्ता खचलेला असल्याने झालेल्या अपघातात टँकर नाल्यात कलंडून दूध वाहून गेल्याने लाखोंचे नुकसान झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली आहे.सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून टँकर चालक किरकोळ जखमी झाला आहे.गुजरात येथून कोनगाव येथील मदर डेअरी च्या कंपनीत हे दूध घेऊन येत असताना हा अपघात झाला आहे.टँकर एका शेताच्या बाजूकडील नाल्यात पलटल्याने टँकरचे बंद केलेले झाकण उचकटल्याने हजारो लिटर दूध शेतात वाहत जावून पूर्ण शेतच दूधमय झाले होते.दरम्यान परिसरातील नागरिकांसह या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांनी दूध घेण्यासाठी घरातील चक्क हंडा,कलशी इतर भांडी घेऊन दूध घेण्यासाठी येत होते.
![Sandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/34d86dfb433da2bf76b2559a05a98a721739703399881718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 16 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/f1f0444cd99d708a7b5171e65487bb8b1739697620703976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sambhajinagar Robbery CCTV : चोरट्यांनी CCTV वर स्प्रे मारला,नंतर ATM फोडलं, 13 लाख लंपास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/8707373714b68ffdd9e66658c40ccdfb1739694324067976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 16 February 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/53668dffb85b3742c672a1eda65b78521739693655706976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bhaskar Jadhav Pc : शिवसेनेनं संधी दिली नाही असं बोललो नाही, भास्कर जाधवांचं स्पष्टीकरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/a6ec00c20623065a0cade1c045c069141739690183429976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)