Sambhajinagar Robbery CCTV : चोरट्यांनी CCTV वर स्प्रे मारला,नंतर ATM फोडलं, 13 लाख लंपास
Sambhajinagar Robbery CCTV : चोरट्यांनी CCTV वर स्प्रे मारला,नंतर ATM फोडलं, 13 लाख लंपास
गरवारे कंपनी समोर अक्सिस बँकेचा एक एटीएम आहे. त्या ठिकाणी आज दिनांक 16 फेब्रुवारी रोजी रात्री 1:45 मिनिटांनी अज्ञात चार इसमांनी तोंडाला रुमाल बांधून एटीएम कक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांच्याकडचे जे स्प्रे होते ते काळ्या स्प्रेने तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरती स्प्रे मारून जे कॅमेरे आहेत ते बंद केले. त्यानंतर गॅस कटरने. एटीएम तोडून त्या एटीएम मध्ये असलेली कॅश ट्रे घेऊन तिथून ते पसार झाले. सदर घटनेची ती घटना सुरू असतानाच मुंबईच्या सर्वेलन्स टीमला सूचना मिळाल्याने त्यांनी ताबडतोप पोलीस नियंत्रण कक्ष छत्रपती संभाजीनगर येथे माहिती दिली. त्यानुसार रात्रगस्तीसाठी असलेले माननीय एसीपी प्रशासन हे जवळच पंढरपूर या ठिकाणी होते. तेथून अवघ्या. सहा मिनिटामध्ये साहेब त्या ठिकाणी पोहोचले. तोपर्यंत एवढ्या सहा मिनिटाच्या वेळेमध्ये त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन तोडून त्यामध्ये असलेली रोख रक्कम रुपये 13,9200 हे घेऊन त्या ठिकाणाहून ते पसार झाले. हा गुन्हा करण्यासाठी अ सदर चोरांनी एका कारचा वापर केला. ती कार इतर दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसून आलेली आहे. तसेच टोल नाक्यावर देखील ती आढळून आलेली आहे आणि त्या दिशेने गुन्याचा तपास सुरू आहे.






















