MHADA exam paper leak : म्हाडा पेपरफुटीचं मराठवाडा कनेक्शन समोर! ABP Majha
आरोग्य विभागापाठोपाठ आता म्हाडाच्या परीक्षेचे पेपरफुटीचे रॅकेट समोर आलंय. यातलं मराठवाडा कनेक्शन पुन्हा एकदा उघड झालंय. आरोग्य विभागाच्या झालेल्या परीक्षेतही जालन्यातील दोन आणि औरंगाबादमधील एका व्यक्तीला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली होती. आता म्हाडा पेपरफुटी प्रकरणी औरंगाबादमधील तीन कोचिंग क्लासेस चालकाना अटक करण्यात आलीय. पुणे पोलिसांच्या सायबर क्राईम शाखेने कारवाी केलीय. औरंगाबादमध्ये सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परिचित असलेले गणिताचे प्राध्यापक अजय चव्हाण आणि सक्षम अॅकॅडमीचे संचालक कृष्णा जाधव, अंकित चनखोरे यांना अटक करण्यात आलीय. हे तिघे
त्यांच्या अकॅडमीमधील विद्यार्थ्यांसाठी रॅकेटच्या प्रमुख सुत्रधाराकडून पेपर विकत घेणार होते अशी माहिती समोर आलीय. स्पर्धा परीक्षा क्लासेसची वाढती संख्या आणि क्रमाने स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा आकडा वाढवण्यासाठी आता क्लासेस चालक आधीच पेपर विकत घेण्याच्या घोटाळ्यात सहभागी होत असल्याचे समोर आलंय.