Uddhav Thackeray Meeting : मातोश्रीवर ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख, पदाधिकाऱ्यांची बैठक
शिवसेनेतल्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या बैठकीला कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघासह मुंबईतल्या बोरिवली, मागाठाणे आणि दहिसर विधानसभा मतदारसंघांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेत गेल्या वर्षी झालेल्या ऐतिहासिक बंडाच्या पार्श्वभूमीवर आपल्या गटाचं अस्तित्व कायम राखण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या मातोश्री निवासस्थानी विभागवार पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरु केला आहे. त्याच मालिकेत उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघासह मुंबईतल्या बोरिवली, मागाठाणे आणि दहिसर विधानसभा मतदारसंघांमधल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.





















