(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahayuti Seat Sharing : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठे अडतंय ?
Mahayuti Seat Sharing : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठे अडतंय ? महायुतीमध्ये नाशिक लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर ठाणे लोकसभेची जागा ही भाजपने मागितलीये. लोकसभेच्या दोन महत्त्वाच्या शिवसेनेच्या खासदार असणाऱ्या जागा भाजप आणि राष्ट्रवादीने मागितल्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा जागा मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेवर दबाव तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा ठाणे आणि नाशिक जागा आपल्याकडेच राहावी यासाठी इतर दोघांवर दबाव तर तिसरीकडे राष्ट्रवादीकडून सातारा लोकसभेची मिळालेली जागा आपल्याकडेच राहावी यासाठी भाजपचा आपल्या इतर दोन मित्र पक्षांवर दबाव पाहायला मिळतोय... त्यामुळे अद्याप जागावाटप पूर्ण होऊ शकलेले नाही. महायुतीतील तिन्ही घटक पक्षांकडून एकमेकांच्या विरोधात दबावतंत्राचं राजकारण केलं जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळतेय...