Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 28 Sep 2024 : 7PM : ABP Majha
महाराष्ट्रात ९ कोटी ५९ लाख मतदार, त्यात ४ कोटी ५९ लाख पुरुष तर ४ कोटी ६४ लाख महिला मतदार. वृद्ध मतदारांना घरुन मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देणार, नवमतदारांची संख्या १९ लाख ४८ हजार. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती.
आम्ही राजकीय पक्षांच्या भेटी घेतल्या. त्यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या, दिवाळीचा मुद्दा सांगत महाराष्ट्रात निवडणुकीची तारीख जाहीर करण्याची विनंती त्यांनी केलीय. ((मुंबईतील पत्रकार परिषदेत)) राजीव कुमार यांची माहिती.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तीन वेळा प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियात गुन्ह्यांची माहिती द्यावी लागणार. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराला का निवडलं याची माहिती राजकीय पक्षांना वर्तमानपत्रातून द्यावी लागणार. नावाची घोषणा करण्यापूर्वी तीन दिवस आधी माहिती देणं बंधनकारक. राजीव कुमार यांची माहिती.
मविआची सावध भूमिका, मुख्यमंत्रीपदाच्या दाव्याबद्दल वक्तव्य न करण्याच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचना, विनाकारण वाद टाळण्यासाठी कार्यकर्त्यांना सक्त सूचना देण्याचे आदेश.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप ओबीसी मतांची मोट बांधणार, मराठा आरक्षणाचा तिढा कायम असताना भाजपचा ओबीसी मतांवर डोळा, प्रत्येक ओबीसी घटकांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न.
महाराष्ट्र बिहार नाही, त्यामुळे निवडणुका एकाच टप्प्यात व्हायला पाहिजेत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
ओबीसी हा भाजपचा डीएनए, ओबीसी समाज आमच्या सोबत कायम राहील, भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंचं वक्तव्य.