VBA ने पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार भाजपसोबत गेला, वंचितच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं, चाबकाने फटके दिले
Beed : वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा नामांकन अर्ज अवैध ठरल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना पाठिंबा दर्शवला होता.
Beed : वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा नामांकन अर्ज अवैध ठरल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना पाठिंबा दर्शवला होता. मात्र सचिन चव्हाण अपक्ष उमेदवाराने भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याने वंचितचे पदाधिकारी आक्रमक झाले. भाजप उमेदवाराला पाठिंबा का दिला?म्हणून वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी अपक्ष उमेदवाराला आधी काळे फासलं. यानंतर चक्क चाबुकाने फटके दिले. एवढेच नाही तर त्याचा व्हिडिओ काढून माफी देखील मागायला लावली. घटना बीडच्या केज राखीव मतदारसंघ अंबाजोगाई शहरातील आहे. दरम्यान या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
गेवराई विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विजयसिंह पंडित यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनाकडून बदामराव पंडित यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. याशिवाय सलग दोनवेळे आमदार राहिलेल्या लक्ष्मण पवारांनी यावेळी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. बदामराव पंडित आणि विजयसिंह पंडित हे नात्याने काका पुतण्या आहेत.
लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांना 39 हजारांचा लीड
बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे असा सामना रंगला होता. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभव पत्करावा लागला होता. लोकसभा निवडणुकीत गेवराई मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना 39 हजार मतांचा लीड मिळाला होता. येथून महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंची पिछेहाट झाली. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीत येथे काय होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या