Maharashtra Superfast News : 10 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP Majha
Maharashtra Superfast News : 10 December 2024 : सुपरफास्ट बातम्या : ABP Majha
राज्यात पाच बनावट कंपन्यांच्या नावे अकरा जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा, या पाचही बनावट कंपन्याचं अस्तित्व फक्त कागदावरच
महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यात कांदा पिकाचा विमा उतरवण्यात मोठा घोटाळा, शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केलेली नसताना, तसेच कमी लागवड केलेली असतानाही जास्तीचा विमा उतरवल्याचा प्रकार समोर.
अजित पवारांविरुद्ध ईडीचे खटले सुरुच राहणार, आयकरद्वारे चौकशी केलेल्या बेनामी मालमत्ता व्यवहार प्रकरणात पवारांना दिलासा, मात्र मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणांमध्ये ईडीनं क्लोजर रिपोर्ट दाखल केला नाही.
वंचितच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रकाश आंबेडकरांची निवड, १२ कार्यकारी सदस्यांची झाली निवडणूक, पक्षाच्या राज्यभरातील ४३५ सदस्यांनी केलं मतदान.
छगन भुजबळांकडून १९८६च्या बेळगाव आंदोलनाचे फोटो पोस्ट, सीमा भागातील मराठी बांधव आजही हक्कासाठी झगडत असल्याचा पोस्टमध्ये उल्लेख.
भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, धमकी देणाऱ्या मनीष निकोसे नावाच्या व्यक्तीची प्रसाद लाड यांना शिवीगाळ, याप्रकरणी गुन्हा दाखल.
अवैधरीत्या वृक्षतोड करणाऱ्यांवर आता शासनाचा बडगा, अनधिकृतरीत्या झाडं तोडण्यासाठी असलेली एक हजार रुपयांचा दंड आता थेट ५० हजार रुपये
कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणातील आरोपी संजय मोरेला २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी, काल रात्री झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू.