Maharashtra SuperFast : महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा : 21 June 2024 : ABP Majha
Maharashtra SuperFast : महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा : 21 June 2024 : ABP Majha
NEET चा पेपर ३२ लाख रुपयांना विकला गेला, परीक्षेआधी एक दिवस प्रश्नपत्रिका दिली गेली, ४ आरोपींनी पोलिसांकडे कबुली दिल्याची सूत्रांची माहिती.
युजीसीकडून आपल्या अधिकृत वेबसाईटवर डिफॉल्टर विद्यापीठांची यादी जाहीर, त्यामध्ये देशातील तब्बल १५७ विद्यापीठांचा समावेश, लोकपालाची नियुक्ती न केल्यानं कारवाई.
युजीसीच्या डिफॉल्टर यादीत राज्यातील ७ विद्यापीठांचा समावेश, मराठवाडा कृषी विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ, राष्ट्रीय कायदा विद्यापीठासह अन्य चार विद्यापीठांवर कारवाई.
अकरावी कोट्यातील रिक्त जागांवर उद्यापासून प्रवेश, २७ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार, तर विद्यार्थांना १ जुलैपर्यंत प्रवेश निश्चिती करता येणार.
आरक्षणाचा प्रश्न सोडवताना राज्यातील सामाजिक समतोल बिघडता कामा नये, मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष होणार नाही याची काळजी सरकारने घ्यायला हवी, जयंत पाटलांचं वक्तव्य.