Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : महाराष्ट्र सुपरफास्ट : 10 जून 2024
राज्यासाठी पुढील ३ ते ४ तास महत्त्वाचे, कोकण किनारपट्टीसह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता.
पुण्यात आजही दुपारनंतर मुसळधार पाऊस, शिवाजी नगर, फर्ग्युसन रोड , आपटे रोडसह अनेक भागात जोरदार पाऊस.
परभणीच्या पाथरी आणि मानवत तालुक्याला पावसाने झोडपलं, मानोलीत ओढ्याच्या पाण्यात दोन महिला पुरात वाहून गेल्या, एका महिलेला वाचवण्यात यश तर एक महिला अद्यापही बेपत्ता.
वाशिम जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी अनेक भागात वादळीवाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. त्यामुळे बळीराजाच्या शेतातील कामांना आणि पेरणीना वेग.
संवर्धनाचे काम सुरु असलेल्या विठ्ठल मंदिरात अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पाण्याची गळती, कामं पूर्ण झाल्यावर सर्व अडचणी दूर होतील, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांचा दावा.
रत्नागिरी-नागपुर राष्ट्रीय महामार्गावरील 400 वर्ष जुनं वडाचं झाड सलगचा पाऊस आणि वाऱ्यामुळं कोसळलं. या वटवृक्षाला वाचवण्यासाठी झालेल्या आंदोलनानंतर सरकारनं राष्ट्रीय महामार्गांसाठी वृक्षतोडीबाबतचा कायदा बदलून नवा कायदा केला होता.
लातूरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पपई बागेचं नुकसान, वीज पडल्याने एकाचा मृत्यू, तर ९ जनावरं दगावली, निलंगा तालुक्याला सर्वाधिक फटका.
नागपूर - वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने संत्रा बाग जमीनदोस्तनागपुरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने मदाना तालुक्यातील शेतकऱ्याची संत्रा बाग जमीनदोस्त, शेतकरी हवालदिल.