एक्स्प्लोर

Maharashtra Politics : भाजपनं अजितदादांच्या चौकशीची मागणी का केली? 'या' आहेत शक्यता

मुंबई:  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या (Ajit Pawar) विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. याआधी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव मंजूर केल्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी लिहिलेल्या पत्रात केली आहे.


चंद्रकांत पाटील यांनी पत्रात काय म्हटलंय?


उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याच्या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप आहेत. 
सीबीआयतर्फे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.
भाजपाच्या प्रदेश कार्यसमितीने या मंत्र्यांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीचा केला होता ठराव.
प्रदेश भाजपच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आपण मागणी करत आहोत. 


भाजप कार्यकारिणीत नेमका काय ठराव मांडला होता?

 


भाजप कार्यकारणीत मांडलेल्या ठरावात म्हटलं आहे की, सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे उघडकीस येत आहेत. बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याच्या ऐवजी हा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा धक्कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून चालू आहे. गृहमंत्र्यांवरील वसुलीच्या आरोपाप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने वसुलीचा आरोप केला. परमबीरसिंग यांच्या पत्राच्या आधारे अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. तशीच सीबीआय चौकशी अजित पवार आणि अनिल परब यांचीही करावी, अशी मागणी ही कार्यकारिणी करत आहे, असा ठराव मांडला होता. 


आधी भाजप कार्यकारिणी अजित पवारांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी केली आणि आता भाजप प्रदेशाध्यक्षांनी थेट अमित शाह यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे येत्या काळात भाजप राष्ट्रवादी विरोधात संघर्ष करायच्या तयारीत दिसत आहे. 2014 पूर्वी भाजप सत्तेत असताना सिंचन घोटाळ्यावरून भाजपनं अजित पवारांविरोधात रान उठवलं होतं आणि आता पुन्हा एकदा भाजप विरोधी पक्षात असताना अजित पवारांविरोधात आक्रमक भूमिका घेत आहे.

 
 

महाराष्ट्र व्हिडीओ

Zero Hour : अर्ज नेत्यांचा, त्रास जनतेला; शक्तिप्रदर्शनामुळे वाहतूक कोंडी
Zero Hour : अर्ज नेत्यांचा, त्रास जनतेला; शक्तिप्रदर्शनामुळे वाहतूक कोंडी

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
Congress Candidate List : काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour : अर्ज नेत्यांचा, त्रास जनतेला; शक्तिप्रदर्शनामुळे वाहतूक कोंडीDevendra Fadnavis Nagpur : उद्यापर्यंत भाजपची दुसरी यादी जाहीर करणार : देवेंद्र फडणवीसRajkiya Sholay : दिल्लीत अमित शाहांच्या उपस्थितीत महायुतीची खलबतं, बैठकीची इनसाईड स्टोरीZero Hour : लोकसभेच्या स्ट्राईक रेटनुसार मुख्यमंत्र्यांची शाहांसमोर अधिक जागांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
लातूरमधून देशमुख बंधू, सोलापुरात एकच उमेदवार; नागपुरातून 4, फडणवीसांविरुद्ध ठरला उमेदवार
Congress Candidate List : काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची पहिली यादी, 5 एसटी, 2 SC अन् दिग्गजांना संधी; पुन्हा दिसली घराणेशाही
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
Ajit Pawar Vs Yugendra Pawar In Baramati : बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे
Raju Shetti : सावकार मादनाईक ऊस परिषदेला येणार की नाहीत? राजू शेट्टी यांनी केला खुलासा!
सावकार मादनाईक ऊस परिषदेला येणार की नाहीत? राजू शेट्टी यांनी केला खुलासा!
Embed widget