एक्स्प्लोर

बार्शीत दिलीप सोपल जिंकले; लक्षवेधी लढतीत राजेंद्र राऊतांचा पराभव; 7 व्यांदा आमदार बनून विधानसभेत

बार्शी विधानसभा मतदारसंघात दिलीप सोपल यंदा शिवसेना युबीटी म्हणजेच ठाकरेंच्या मशालीकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत.

सोलापूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीत यंदा वेगळीच रंगत आहे, कारण पहिल्यांदाच शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होत आहे. त्यात, सोलापूर जिल्ह्यात भाजपला टस्सल देत यंदा शरद पवारांनी स्वत: लक्ष घातलं आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या रणनीतीमुळे जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहे. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीतही तशीच रंगत असणार आहे. जिल्ह्यातील बार्शी मतदारसंघ यंदा मनोज जरांगे व आमदार राजेंद्र राऊत यांच्यामुळे राज्यात लक्षवेधी आहे. त्यातच, येथील मतदारसंघात माजी मंत्री दिलीप सोपल (Dilip Sopal) व आमदार राजेंद्र राऊत यांच्यातच खरी लढत झाली. त्यामध्ये, आज निवडणूक निकाल हाती आला असता, 20 व्या फेरीअखेर दिलीप सोपल हे 6342 मतांनी आघाडीवर आहेत.  अखेर, 24 फेऱ्यांचा निकाल हाती आल्यानंतर महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा पराभव झाला असून शिवसेना ठाकरे गटाचे दिलीप सोपल 6472 मतांनी विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे दिलीप सोपल हे 7 व्यांदा आमदार बनून विधानसभेवर गेले आहेत.

बार्शी विधानसभा मतदारसंघात दिलीप सोपल यंदा शिवसेना युबीटी म्हणजेच ठाकरेंच्या मशालीकडून निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर, आमदार राजेंद्र राऊत हे महायुतीचे उमेदवार होते. त्यामुळे येथील मतदारसंघात काँटे की लढत होणार आहे. आमदार राऊत यांनी गत 5 वर्षांच्या काळात केलेल्या विकासकामांच्या आणि खेचून आणलेल्या निधीच्या जोरावर ते जतनेकडे जात आहेत. तर, तालुक्यातील जनतेला मोकळा श्वास घेता यावा म्हणून आपण मैदानात आहेत, असे म्हणत दिलीप सोपल यांनी राऊतांवर अप्रत्यक्षपणे टीका केलीय. मतदारसंघात गेल्या 25 वर्षांपासून थेट सोपल विरुद्ध राऊत असाच सामना होत आहे. बार्शीत राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे नेते आणि माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांची यंदा दिलीस सोपल यांना साथ आहे. मात्र, गत 2019 च्या निवडणुकीत त्यांनी आमदार राऊत यांच्यासाठी काम केलं होतं. त्यामुळे, त्यांचा इम्पॅक्ट मतदारसंघात होईल का हेही पाहावे लागेल. तसेच, यंदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलं असताना, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगेंसोबत थेट पंगा घेतल्याने या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तसेच, येथील मतदारसंघात मनोज जरांगे फॅक्टरचा परिणाम होईल का, त्याचा फटका कोणाला बसेल हे निकालाच्या दिवशीच समजणार आहे. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय?

गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत बार्शी मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली. शिवसेना युतीकडून माजी मंत्री दिलीप सोपल यांना तिकीट मिळालं होतं. सोपल यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवारांची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. तर, भाजपकडून इच्छुक असलेल्या राजेंद्र राऊत यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यामुळे, येथील मतदारसंघात आघाडीकडून निरंजन भूमकर यांना तिकीट देण्यात आलं होतं. भूमकर यांना बार्शी तालुक्यातील वैराग भागात जनाधार आहे. त्यामुळे, भूमकर यांना तिकीट देऊन शरद पवार व अजित पवार यांनी त्यांच्यासाठी सभाही घेतल्या होत्या. दरम्यान, येथील निवडणुकीत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत हे 3076 मतांनी विजयी झाले. तर, भूमकर यांच्या उमेदवारीचा फटका सोपल यांना बसला होता. यंदाही सोपल विरुद्ध राऊत यांच्यात तगडी फाईट असल्याचे दिसून येते. 

लोकसभेला ओमराजेंना मोठं मताधिक्य

लोकसभा निवडणुकीत बार्शी मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना मोठं मताधिक्य मिळालं आहे. ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला. त्यात, बार्शी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना महाविकास आघाडीच्या ओमराजे निंबाळकर यांना तब्बल 55 हजारांचं मताधिक्य आहे. बार्शी मतदारसंघात त्यांच्यासाठी दिलीप सोपल यांच्या नेतृत्वात प्रचाराची धुरा सांभाळण्यात आली होती. त्यामुळे, विधानसभा निवडणुकांसाठी दिलीप सोपल यांचं पारडं मतदारसंघात वरचढ मानलं जात आहे. मात्र, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं गणित वेगळं असतं, असाही राजकीय अंदाज काहीजण व्यक्त करतात. 

बार्शी मतदारसंघात 3 लाख 32 हजार मतदान

सोलापूर जिल्ह्यातील 246 बार्शी विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख, 32 हजार, 28 मतदार नोंदले गेले आहेत. त्यापैकी 1 लाख 70 हजार 930 पुरुष आणि 1 लाख, 61 हजार, 55 महिला मतदारांचा समावेश आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदारसंख्येत यंदा 2.58 टक्के वाढ झाली आहे.

हेही वाचा

राज्यातील 288 मतदारसंघातील सर्वपक्षीय उमेदवारांची यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Yashwant Varma : पहिल्यांदा न्यायमूर्तींच्या बंगल्यात पैसा सापडलाच नाही म्हणाले अन् मध्यरात्री सुप्रीम कोर्टाकडून पोतीच्या पोती भरून जळालेल्या पैशाचा व्हिडिओ मध्यरात्री शेअर!
पहिल्यांदा न्यायमूर्तींच्या बंगल्यात पैसा सापडलाच नाही म्हणाले अन् मध्यरात्री सुप्रीम कोर्टाकडून पोतीच्या पोती भरून जळालेल्या पैशाचा व्हिडिओ मध्यरात्री शेअर!
Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंह राजपूतला विष दिलं की गळा दाबला, चॅटिंगमध्ये काय सापडलं? सीबीआय रिपोर्टमधील 10 महत्त्वाच्या गोष्टी
सुशांत सिंह राजपूतला विष दिलं की गळा दाबला, चॅटिंगमध्ये काय सापडलं? सीबीआय रिपोर्टमधील 10 महत्त्वाच्या गोष्टी
Devendra Fadnavis : फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Virat Kohli : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात किंग खानकडून कोहली कोहलीचा गजर, रिंकू सिंगकडून विराटचा अपमान? नेमकं काय घडलं?
आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात किंग खानकडून कोहली कोहलीचा गजर, रिंकू सिंगकडून विराटचा अपमान? नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 08 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra News 23 March 2025ABP Majha Headlines : 7 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsSushant Singh Rajput Case : सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कारण समोर, सीबीआयच्य अंतिम अहवालात काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yashwant Varma : पहिल्यांदा न्यायमूर्तींच्या बंगल्यात पैसा सापडलाच नाही म्हणाले अन् मध्यरात्री सुप्रीम कोर्टाकडून पोतीच्या पोती भरून जळालेल्या पैशाचा व्हिडिओ मध्यरात्री शेअर!
पहिल्यांदा न्यायमूर्तींच्या बंगल्यात पैसा सापडलाच नाही म्हणाले अन् मध्यरात्री सुप्रीम कोर्टाकडून पोतीच्या पोती भरून जळालेल्या पैशाचा व्हिडिओ मध्यरात्री शेअर!
Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंह राजपूतला विष दिलं की गळा दाबला, चॅटिंगमध्ये काय सापडलं? सीबीआय रिपोर्टमधील 10 महत्त्वाच्या गोष्टी
सुशांत सिंह राजपूतला विष दिलं की गळा दाबला, चॅटिंगमध्ये काय सापडलं? सीबीआय रिपोर्टमधील 10 महत्त्वाच्या गोष्टी
Devendra Fadnavis : फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा ठाकरेंच्या सेनेचा इशारा, पोलिसांनी तत्काळ उचललं मोठं पाऊल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Virat Kohli : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात किंग खानकडून कोहली कोहलीचा गजर, रिंकू सिंगकडून विराटचा अपमान? नेमकं काय घडलं?
आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात किंग खानकडून कोहली कोहलीचा गजर, रिंकू सिंगकडून विराटचा अपमान? नेमकं काय घडलं?
दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
दिवसाढवळ्या रुग्णालयातील चेंबरमध्ये घुसून 30 वर्षीय महिला संचालकाची निर्घृण हत्या; सहा गोळ्या झाडल्या, खोली धुवून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
Eknath Khadse : जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
जळगावमध्ये माजी उपसरपंचाला संपवलं, एकनाथ खडसेंचा संताप; म्हणाले, आता राज्यात...
Jaykumar Gore: कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही; देवाभाऊ माझ्या पाठिशी; जयकुमार गोरे कडाडले
कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाकडं करु शकत नाही; देवाभाऊ माझ्या पाठिशी; जयकुमार गोरे कडाडले
Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, धरणांमध्ये फक्त 39 टक्के पाणीसाठा, पाणीकपात टाळण्यासाठी तातडीचं पाऊल
Embed widget