एक्स्प्लोर

Ajit Pawar Vs Yugendra Pawar In Baramati : बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!

लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पाठीमागे संपूर्ण पवार कुटुंबीय उभे राहिले होते. त्यामुळे अजित पवार कुटुंब एकाकी पडल्याची चर्चा होती. अजित पवार यांनी ती खंत बोलून सुद्धा दाखवली होती.

Ajit Pawar Vs Yugendra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सर्वाधिक घमासान गेल्या पाच दशकांपासून पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये चांगलंच घमासान सुरु आहे. बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा महामुकाबला रंगला होता. या निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव केला होता. यानंतर पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीसाठी पवार विरुद्ध पवार असा महामुकाबला रंगणार आहे. आज (24 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये बारामतीमधून अजित पवार यांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काका विरुद्ध पुतण्या या लढतीत कोण बाजी मारणार? याचे उत्तर 23 नोव्हेंबर रोजी मिळणार आहे. बारामतीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून भावनेचं आणि आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरु आहे.

लोकसभेच्या निकालानंतर शरद पवारांवर थेट टीका टाळली!

लोकसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये सातत्याने शरद पवार यांच्यावर बोचरी आणि घणाघाती टीका सुरू केली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर हा डाव अजित पवार यांच्यावरच उलटला होता. अजित पवार यांच्या विरोधात बारामतीमधील जनादेश लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आला होता. त्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या चुकांची कबुलीसुद्धा नंतर अजित पवार यांनी दिली. शरद पवार यांच्यावर केलेली टीका सुद्धा त्यांनी करायला नको ती इथपर्यंत अजित पवार यांची वक्तव्य चांगलीच चर्चेत राहिली. त्यामुळे आता आपण विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार बारामतीमध्ये कोणत्या पद्धतीने सामोरे जाणार? याची उत्सुकता असेल.

बारामती न लढण्याची चर्चा, पण पुन्हा रिंगणात! 

लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाला जोरदार झटका बसला होता. पक्षाला अवघी एक जागा जिंकता आली होती. रायगड लोकसभा सुनील तटकरे यांनी जिंकली. अन्य जागांवर अजित पवार गटाचा दारुण पराभव झाला. त्यानंतर बारामतीमधून अजित पवार यांनी सुद्धा निवडणूक ने लढण्याचे संकेत दिले होते. अजित पवार यांनी भावनिक वक्तव्ये सुद्धा केली होती. त्यामुळे अजित पवार यांच्यानंतर बारामतीमधून कोणाला संधी दिली जाणार? अशी सुद्धा चर्चा रंगली रंगली होती. मात्र, पक्षाकडून अजित पवार हेच लढतील याबाबत सुतोवाच करण्यात आले. लोकसभेला अजित पवार यांच्याकडून सातत्याने भावनेचा मुद्दा जोडण्याचा प्रयत्न केला जात होता. तसेच त्याला बळी पडू नका असे म्हणत सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना टार्गेट केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देण्याचे काम शरद पवार गटाकडून केलं जात होतं. मात्र या लढाईमध्ये सुप्रिया सुळे यांनीच लोकसभा निवडणुकीमध्ये बाजी मारली होती. 

अजित पवार यांना घरातच घेरण्याची तयारी?

आता विधानसभा निवडणुकीमध्ये युगेंद्र पवार यांच्या विरोधात अजित पवार यांच्याकडून कोणती रणनीती आखली जाणार? याकडे सुद्धा लक्ष असेल. शरद पवार गटाकडून अजित पवार यांना एक प्रकारे पुन्हा एकदा घरातच घेण्याची तयारी सुरू आहे का? असा सुद्धा प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या पाठीमागे संपूर्ण पवार कुटुंबीय उभे राहिले होते. त्यामुळे अजित पवार कुटुंब एकाकी पडल्याची चर्चा होती. इतकेच नव्हे तर अजित पवार यांनी ती खंत बोलून सुद्धा दाखवली होती. त्यामुळे आता विधानसभेला सुद्धा लढाई होत असताना अजित पवार यांच्याकडून बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणते मुद्दे मांडले जाणार आणि त्याला युगेंद्र पवार यांच्याकडून कोणत्या पद्धतीने प्रत्युत्तर दिलं जाणार? ही सुद्धा चर्चा आहे. 

बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून झालेली टीका अजित पवार यांनी योग्य नसल्याचे म्हटलं होतं. इतकेच नव्हे तर बारामतीमध्ये जात देवेंद्र फडणीस यांनी सुद्धा ही लढाई पवार विरुद्ध पवार नाहीतर मोदी विरुद्ध राहुल गांधी असं सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेवटी या लढाईमध्ये शरद पवार यशस्वी झाले होते. लोकसभा निवडणुकीपासून युगेंद्र पवार खऱ्या अर्थाने बारामतीमध्ये सक्रिय झाले होते. मतदारसंघामध्ये भेटीगाठी करण्यापासून ते आशीर्वाद यात्रा सुद्धा त्यांनी काढली होती. त्यामुळे एक प्रकारे मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला आहे.  

2019 मध्ये काय घडलं?

बारामती विधानसभेला 2019 मध्ये अजित पवार यांनी भाजपचे  उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा दारुण पराभव केला होता. त्यांनी 1 लाख 95 हजार 641 मते मिळवली होती. पडळकर यांना अवघी 30 हजार 376 मते मिळाली होती. ते 1991 पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. अजित पवार सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत.सध्या ते पाचव्यांदा या पदावर आहेत. त्यामुळे  अजित पवार यांच्यासमोर मताधिक्य राखण्यापासून ते विजयश्री कायम राखण्यापर्यंत संघर्ष करावा लागणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
Congress Candidate List : काँग्रेसची विधानसभा निवडणुकीसाठी 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना संधी
काँग्रेसची विधानसभा निवडणुकीसाठी 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना संधी
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8 PM : 24 October 2024 :  एबीपी माझा 8 च्या हेडलाईन्सMuddyache Bola Panvel Vidhan Sabha : पनवेलमध्ये नवा आवाज घुमणार की 'ठाकूर' राज्य पुन्हा येणार?Rohit Pawar Full Speech : संजयकाका पाटलांवर थेट हल्ला, आबांच्या लेकासाठी रोहित पवार मैदानात!Top 50 News | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा , सुपरफास्ट  बातम्या : विधानसभा निवडणूक : 24 OCT 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
बार्शीत सोपल की राऊत, जरागें फॅक्टर लक्षवेधी ठरणार का; विधानसभा निवडणुकीत कोण मारणार बाजी?
Congress Candidate List : काँग्रेसची विधानसभा निवडणुकीसाठी 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना संधी
काँग्रेसची विधानसभा निवडणुकीसाठी 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना संधी
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
रायगडमध्ये जमीन, मुंबईत गाळे, लॅव्हिश कार, दागिने, बँकेत 2 कोटी; आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
विदर्भामधील मोजक्या जागांवर तिढा कायम; सुनील केदार आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत नेमकं काय झालं?
Ajit Pawar Vs Yugendra Pawar In Baramati : बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध तगडी फाईट होणार; अजितदादांना घरातच घेरण्याची पुन्हा एकदा तयारी!
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे
Raju Shetti : सावकार मादनाईक ऊस परिषदेला येणार की नाहीत? राजू शेट्टी यांनी केला खुलासा!
सावकार मादनाईक ऊस परिषदेला येणार की नाहीत? राजू शेट्टी यांनी केला खुलासा!
अजित पवारांविरुद्ध उमेदवारी जाहीर होताच युगेंद्र पवारांचा पहिला हल्ला, म्हणाले, बारामतीचा भ्रष्टाचार संपवणार!
अजित पवारांविरुद्ध उमेदवारी जाहीर होताच युगेंद्र पवारांचा पहिला हल्ला, म्हणाले, बारामतीचा भ्रष्टाचार संपवणार!
Embed widget