एक्स्प्लोर
2019 च्या विधानसभेला 1 हजारांच्या आत मताधिक्यांनी विजयी झालेले 5 आमदार, एकाचं तिकीट कापलं
राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता उमेदवारांची नावे जाहीर होत आहेत. त्यामध्ये, महायुतीने आघाडी घेतली असून 182 उमेदवारांची घोषणा केली आहे.
MLA who won margin below 1 thousand in 2019 vidhansabha
1/7

राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता उमेदवारांची नावे जाहीर होत आहेत. त्यामध्ये, महायुतीने आघाडी घेतली असून 182 उमेदवारांची घोषणा केली आहे.
2/7

महायुतीमधील भाजपने 99, शिवसेना 45 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये, काही विद्यमान आमदारांचं तिकीट कापण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
3/7

गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कमी मताधिक्याने विजयी झालेल्या उमेदवारांवर टांगती तलवार होती. त्यामध्ये, कोपरगाव मतदारसंघातून आशुतोष काळे हे 822 मतांनी विजयी झाले होते. त्यांना यंदाही अजित पवारांनी तिकीट दिलं आहे.
4/7

शिवसेना शिंदे यांच्या पक्षातील शहाजी बापू पाटील हे गत निवडणुकीत 768 मतांनी विजयी झाले होते. यंदा त्यांना शिवसेनेकडून तिकीट देण्यात आलं आहे. सांगोला मतदारसंघातून ते मैदानात आहेत.
5/7

दौंड मतदारसंघातील राहुल कूल यांच्या मतदारसंघाचा निर्णय अद्याप बाकी आहे. मात्र, गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 746 मतांनी विजय मिळाला होता.
6/7

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाकडून विद्यमान मनोहर चंद्रिकापुरे यांचं तिकीट कापण्यात आलंय. चंद्रिकापुरे यांना गत निवडणुकीत 718 मतांनी विजय मिळाला होता. यंदा तेथून राजकुमार बडोले यांना राष्ट्रवादीने तिकीट दिलं आहे.
7/7

शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार दिलीप लांडे यांनाही तिकीट दिलं आहे. मात्र, गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना केवळ 409 मतांनी विजय मिळाला होता. म्हणजेच, 1000 पेक्षा कमी मताधिक्य घेऊन 5 आमदार विजयी झाले होते.
Published at : 23 Oct 2024 02:48 PM (IST)
आणखी पाहा























