Hingoli Rain : देवजना गावात पूरस्थिती; जनजीवन विस्कळीत
Hingoli Rain : देवजना गावात पूरस्थिती; जनजीवन विस्कळीत
हवामान विभागाने वर्तविलेल्या (IMD) अंदाजानुसार नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना दमदार पावसाने (Heavy Rain) अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. पश्चिम विदर्भ आणि मध्यप्रदेशातील काही जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे विदर्भातील बहुतांश भागात जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या हनुमान सागर प्रकल्पात मोठ्या प्रमाणात जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पातून काल रात्री तीन हजार क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील वान नदीला मोठा पूर आल्याचे चित्र आहे.
चुकीच्या ठिकाणी बांध बांधला म्हणून गावात पूर
परिणामी, वान नदीला आलेल्या पुरामुळे जवळपास आठ ते दहा गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला असून पुरामुळे शेकडो हेक्टर वरील केळीचे पीकही पाण्याखाली गेले आहे. तर जिल्ह्यातील मोमिनाबाद, वडगाव, वान, कोलद या गावांचा संपर्क गेल्या अनेक दिवसापासून तुटला आहे. वान नदीवर मोमिनाबाद गावाजवळ प्रशासनाने चुकीच्या ठिकाणी बांध बांधल्याने ही परिस्थिती उद्भवली, असा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोमिनाबाद या गावाचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे. मात्र अद्यापही प्रशासनाने लक्ष दिलं नसल्याचा आरोप ही गावकऱ्यांनी केला आहे.