एक्स्प्लोर

Harshwardhan Patil PC : विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे हा कार्यकर्त्यांचा आग्रह- हर्षवर्धन पाटील

Harshwardhan Patil PC : विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे हा कार्यकर्त्यांचा आग्रह- हर्षवर्धन पाटील 

हर्षवर्धन पाटलांच्या (Harshvardhan Patil) शरद पवार गटातील राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन पाटील यांचं आमच्या पक्षांमध्ये स्वागत करतो असे पवार म्हणाले. राष्ट्रवादी प्रवेशाचे अशा पध्दतीचे अनेक धक्के येत्या काही काळात दिसून येतील, असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. दरम्यान, हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीची विचारधारा मांडत असतील तर ते केव्हाही पक्षात येऊ शकतात, त्याचे स्वागत होईल असेही शरद पवार म्हणाले.   हर्षवर्धन पाटलांनी भूमिका केली जाहीर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता की शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करावा. त्यामुळं आम्ही हा निर्णय घेत असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला. दरम्यान, आता लवकरच हर्षवर्धन पाटील हे जाहीररित्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत.   कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर घेतला निर्णय हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी देखील रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशी मागणी केली. यानंतर पत्रकार परिषद घेत पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय गेतला आहे. मी हा निर्णय घेण्यापूर्वी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतल्याचे पाटील म्हणाले. इंदापूरची जागा ही विद्यमान सदस्याला जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. दुसरा पर्याय काढू असे फडणवीस म्हणाले. पण दुसरा पर्याय स्वीकारणे कार्यकर्त्यांना मान्य झाले नसते. व्यक्तिगत तो निर्णय योग्य ठरला असता, पण जनतेचा प्रश्न असतो असे पाटील म्हणाले. इंदापूर तालुक्यातील सर्व राजकीय निर्णय जनतेच्या मताने झाले आहेत. इंदापुरात कोणाच्या स्वार्थासठी निर्णय होत नाहीत असेही पाटील म्हणाले. जनतेच्या ज्या भावना आहेत त्यांच्या भावना जाणून निर्णय घेतला असल्याचे हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले. आपला निर्णय झाल्यावर ज्या पक्षातले नेते पुढची भूमिका जाहीर करतील. तो अधिकार आपला नाही. पक्षातील नेते योग्य निर्णय गेतली असेही पाटील म्हणाले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Cabinet Meeting Maharashtra : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा पाऊस; 41 महत्त्वाचे निर्णय
Cabinet Meeting Maharashtra : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा पाऊस; 41 महत्त्वाचे निर्णय

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार 
Rahul Gandhi In Kolhapur : राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द; बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे उद्या होणार लोकार्पण
राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द; बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे उद्या होणार लोकार्पण
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Cabinet Meeting Maharashtra : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा पाऊस; 41 महत्त्वाचे निर्णयABP Majha Headlines :  6 PM : 4 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBopdev Ghat Crime:  बोपदेव घाटातील अत्याचार प्रकरणाती संशयित आरोपींचं स्केच पूर्णRahul Gandhi Kolhapur Visit : राहुल गांधी दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
वीर सावकर ट्रस्टला मुंबईतील मोक्याची पावणे तीन एकर जमीन बक्षीस, कॅबिनेट बैठकीत निर्णय; काँग्रेस संतप्त
धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
धक्कादायक! माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या आईचा पुण्यातील घरात आढळला मृतदेह; पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार 
Rahul Gandhi In Kolhapur : राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द; बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे उद्या होणार लोकार्पण
राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द; बावड्यातील शिवरायांच्या पुतळ्याचे उद्या होणार लोकार्पण
Maharashta Vidhan Sabha Election : सांगली जिल्ह्यातील भाजपमधील नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर; प्रवेशासाठी बैठक सुद्धा झाल्याची चर्चा!
सांगली जिल्ह्यातील भाजपमधील नाराज नेते काँग्रेसच्या वाटेवर; प्रवेशासाठी बैठक सुद्धा झाल्याची चर्चा!
खेळाडू मालामाल.. राज्य सरकारकडून पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ; ऑलिंपिकविजेत्यास 5 कोटी
खेळाडू मालामाल.. राज्य सरकारकडून पारितोषिकांच्या रक्कमेत वाढ; ऑलिंपिकविजेत्यास 5 कोटी
Harshvardhan Patil: शरद पवारांच्या निर्णयावर आक्षेप? इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर झळकला आणखी एक बॅनर, पाटलांसमोर आव्हाने?
शरद पवारांच्या निर्णयावर आक्षेप? इंदापुरात हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर झळकला आणखी एक बॅनर, पाटलांसमोर आव्हाने?
Rahul Gandhi In Kolhapur : कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तरी कसा? राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण
कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तरी कसा? राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण
Embed widget