Cabinet Meeting Maharashtra : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा पाऊस; 41 महत्त्वाचे निर्णय
Cabinet Meeting Maharashtra : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा पाऊस; 41 महत्त्वाचे निर्णय
विधानसभेची (Vidhan Sabha Election) आचारसंहिता कोणत्याही क्षणाला लागू शकते. त्यामुळे महायुती सरकारने त्यापूर्वी जणू निर्णयांचा धडाका सुरू केल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.10) राज्याची मंत्रिमंडळ बैठक पार पडली. विशेष म्हणजे एकाच आठवड्यात ही दुसऱ्यांदा घेतलेली राज्य मंत्रिमंडाळाची (Cabinet Meeting) बैठक आहे. या बैठकीत 33 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. दरम्यान विधानसभेपूर्वी केंद्रानं देखील आणखी एक मोठा निर्णय घेत राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर' असे नामांतर करण्याची मागणीला मोदींच्या मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे या निर्णयाचे स्वागत होत असल्याचे चित्र आहे. तर प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाखाच्या दंडाची तरतूदही आज राज्य मंत्रिमंडाळाच्या बैठकीत करण्यात आली आहे.
![ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/f50b4dd4432551bcdd60230fe713f9e21739814514058977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)